IHRA News

IHRA Live News

भारतीय जनता पार्टीच्या अट्टाहासानेअतिवृष्टीची मदत . विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर.

महाबळेश्वर प्रतिनिधी .
बाजीराव उंबरकर .
22 जुलै रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आढावा घेत विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले महाबळेश्वर येथील हिरडा वन विश्रामगृहामध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रविण दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अतिवृष्टी काळामधे भारतीय जनता पार्टीने तातडीच्या मदतीसाठी वारंवार अट्टाहास धरल्याचे नमुद केले अतिवृष्टीनंतर अवकाळीमुळे महाबळेश्वर तालुक्यात स्ट्राबेरी उत्पादक शेतकऱ्यांच झालेल नुकसान व त्याप्रती सत्ताधारी पक्षाची उदासीनता यावर नाराजी व्यक्त करताना कोवीड काळामध्ये पुर्णपणे ठप्प झालेल्या महाबळेश्वरच्या अर्थव्यवस्थेवर दुर्ष्टीक्षेप टाकला .दरम्यानच्या काळामधे महाबळेश्वर मधील सर्व उद्योगधंदे ठप्प झालेले असताना देखील महाबळेश्वर नगरवासीयांपर्यत कोणतेही शासकीय मदत न पोहोचल्याचे दु;ख देखील प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले.त्याचप्रमाणे महाबळेश्वर तालुक्यातील विविध समित्यांची खातेनिहाय चौकशी करुन वन समित्यांचा अनागोंदी कारभार आणी कामगारांवर तो होनारा आत्याचार या विरोधात अगामी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचे स्पष्ट केले .सद्या महाराष्ट्रात गाजत आसलेल्या संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त करताना ही पत्रकार परिषद निव्वळ फुसका बार होता महावितरण आघाडीचे सरकार हे सुडबुद्धीचे राजकारण करत असून राज्यातील जनतेचे लक्ष्य विचलित करण्याची विकृत मानसिकता या सरकारची आहेअसा घनाघात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला.याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री तानाजी भिलारे सरचिटणीस तालुकाध्यक्ष मधुकर बिरामणे जिल्हा सरचिटणीस रविंद्र कुंभारदरे शेखर भिलारे जगन्नाथ भिलारे संतोष कवी सनी मोरे अदी कार्यकर्ते उपस्थित होते.

0Shares
error: Content is protected !!