IHRA News

IHRA Live News

पर्यावरण संवर्धनाकरिता विद्यार्थ्यांची सीड बॉल कार्यशाळा

वर्धा 1:- दिपाली चौहान/

पर्यावरण संवर्धनाकरिता विद्यार्थ्यांची सीड बॉल कार्यशाळा
-ग्रामगीता जीवन विकास परीक्षा व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचा उपक्रम

  • कार्यशाळेत 127 विद्यार्थी व पर्यावरण प्रेमी नागरिकांनी तयार केले 1250 सीड बॉल
    -वर्धेकरांनी जाणून घेतली वृक्षारोपणाची अभिनव संकल्पना

वर्धा- ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभाग गुरुकुंज आश्रम जिल्हा -वर्धा व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांनी भविष्यात काहीतरी सृजनशील करण्याचा मानस ठेवून पर्यावरण संवर्धनाकरिता नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याच्या दृष्टिकोनातून आयोजित सीड बॉल तयार करण्याच्या कार्यशाळेत 127 विद्यार्थी व पर्यावरण प्रेमी नागरिकांनी 1250 सीड बॉल तयार केले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वर्धा येथे आयोजित कार्यशाळेला जिल्ह्यातील विद्यार्थी व निसर्गप्रेमी नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. सदर कार्यशाळेत टेकडी, माळरान आदी ठिकाणी वृक्षारोपण करतांना येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी वृक्षारोपणाची अभिनव पद्धत म्हणून बिजगोळे (सीड बॉल) टाकण्यासाठी माती,विविध झाडांच्या बिया, शेणखत, गांडूळ खत, निंबोळी अर्क, कोळसा,भुसा,राख आदीपासून सीड बॉल तयार करण्याचे प्रशिक्षण मगन संग्रहालय समिती गिरडचे डॉ. विष्णू ब्राह्मणवाडे यांनी दिले. आगामी काळात सीड बॉल सुकल्यानंतर आणि पाऊस पडल्यानंतर त्यांच्या रोपणाचे प्रात्यक्षिक विद्यार्थी व निसर्गप्रेमी नागरिकांना देण्यात येणार आहे.
कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे होते. उद्घाटन श्रीगुरुदेव मासिकाचे संपादक डॉ. दीपक पुनसे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय मेहेर, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. नितू गावंडे, अधिव्याख्याता प्रतिभा देशपांडे, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, ग्रामगीता जीवन विकास परीक्षेचे मार्गदर्शक संजय ठाकरे, सायबर तज्ञ, दहशतवाद विरोधी पथक नागपूरचे राहुल कन्नाके, ग्रामगीता जीवन विकास परीक्षेचे तालुका प्रमुख प्रकाश राऊत, जिल्हा कोषाध्यक्ष संजय वाके कार्यशाळेचे तज्ञ मार्गदर्शक विष्णू ब्राह्मणवाडे, ग्रामगीता जीवन विकास परीक्षेचे जिल्हा प्रमुख मनिष जगताप यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख अतिथींनी मार्गदर्शन करतांना सद्यस्थितीत पाण्याची कमतरता, वाढते तापमान, कमी प्रमाणात पडणारा पाऊस अश्या अनेक समस्या निर्माण झाल्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गाचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची असल्याची भावना व्यक्त केली.
प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून गुरुदेव हमारा प्यारा.. संकल्प गीत घेण्यात आले. समारोपीय कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे, विशेष तज्ञ गजानन वैद्य, ओंजळ संस्थेच्या अध्यक्ष प्राजक्ता मुते, मुख्याध्यापक रवींद्र पावडे,प्रमिला भटकर, दीपा गिरी, तृप्ती कुकडे,निता नागपुरे,वैद्यकीय जनजागृती मंचचे निलेश चौधरी, रवींद्र देशमुख, विद्या नरड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक मनिष जगताप तर संचालन कार्यशाळा समन्वयक विद्या नरड यांनी केले.आयोजनात दीपक आखाडे, मनीष हाडके, दिनेश गुळघाणे,हर्षल परतेकी, सौरभ वाघमारे,पंकज देशमुख, दीपक डोंगरे,राहुल दुधकोर,बारोकर, रितेश वंडले,नंदिनी महल्ले,अर्शीया बेग, दीप्ती चव्हाण, अविष्कार देशमुख, अनुराधा भेंडे, सुनील लोखंडे, विनोद धोबे,गणेश पाटील,मुख्याध्यापक,
शिक्षक, पालक तसेच ओंजळ सामाजिक संस्था टीम, अवंतिका भेंडे, श्रावणी धोंगडे, उदय पेंदाम,आदित्य युवनाथे यांनी सहकार्य केले.

0Shares
error: Content is protected !!