IHRA News

IHRA Live News

जावलीचे सुपुत्र म्हणून एकत्र येवूया;अा.शशिकांत शिंदे

कदिर मणेर/सातारा प्रतिनिधी प्रतापगड सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक घोषित झाली आहे. कै. लालसिंगराव काका कै.राजेंद्र काका यांनी जावळीच्या माळ रानावर आदरणीय शरदचंदजी पवारसाहेब यांच्या आशीर्वादाने प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली,त्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला.आज जावळीच्या खोऱ्यात भविष्य काळामध्ये ऊस उत्पादन वाढेल. महू हातगेघर धरण अशा विविध माध्यमातून हा कारखाना उभा राहिला.पूर्वी परिस्थिती अशी नव्हती ती परिस्थिती बदललेली आहे.आजच्या परिस्थितीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ऊसाच्या गाळपा बद्दल,ऊस तोडणी बद्दल अनेक शेतकऱ्यांची मागणी होती संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रतापगड कारखाना किसनवीर कारखाना आणि खंडाळा कारखाना बंद आहे यामुळे ऊस इतक्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये उभा राहिलेला आहे तो तुटला गेला नाही या चिंतेमध्ये शेतकरी आहे.सगळ्यांची मागणी आहे प्रतापगड सहकारी साखर कारखाना चालू झाला पाहिजे आणि अशा पद्धतीने या परिस्थितीमध्ये ही निवडणूक होत आहे. निवडणूक लढवावी अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती परंतु पक्षश्रेष्ठी आणि आपण सर्वांच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन हा कारखाना काही करुन पुढच्या वर्षी चालू झाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या फार अपेक्षा तुमच्या आमच्या कडून आहेत. आणि या जावली तालुक्यातील,साताऱ्यातील असलेल्या शेतकऱ्यांना त्यामुळे न्याय मिळेल ऊस मार्गी लागेल,माझी विनंती आहे निवडणूक बिनविरोध करावी सर्व संमतीने चांगले उमेदवार देऊन ही निवडणुक बिनविरोध होत असताना आपला सर्वांचा पाठिंबा आशीर्वाद द्यावा.ही जबाबदारी घेत असताना पुढच्या वर्षी कारखाना चालू झाला पाहिजे ही भुमिका घेऊनच आपण काम केले पाहिजे हा विश्वास त्या ठिकाणी देतो. माझी विनंती आहे सगळेजण एकत्र येऊन हा कारखाना शेतकऱ्यांसाठी कोणत्याही परिस्थितीत प्रयत्न करू त्यामध्ये मी स्वतः पण सहभागी आहे. हा विश्वास आपणास देतो.तुम्हाला दिलेला शब्द शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करून प्रतापगड कारखाना पुढच्या गाळपा पर्यंत उभा राहील आणि तयारीत राहील हा अजेंठा असेल.आपणा सर्वांना विनंती करतो की निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करूया या कारखान्याच्या घडामोडींमध्ये जी लोक आहेत त्या सर्वांनी एकत्रित येऊन भविष्यकाळात जावली च्या विकासासाठी एक नवीन दालन उभ करू.आदरणीय शरद पवारसाहेब,अजित दादांचं तसेच प्रत्येक मान्यवर नेत्यांचं असलेले मार्गदर्शन पाठबळ आणि आशीर्वाद घेऊन हा कारखाना चालू करू. त्यासाठी आपण सर्वजण एकत्रित येऊ या मतभेद राजकारणातून दरी निर्माण होऊन त्यातून कारखाना पुन्हा बंद होऊ होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण करण्यापेक्षा एकत्र येऊन जावलीचे सुपुत्र म्हणून एकत्र येऊया सगळ्यांनी निवडणूक बिनविरोध करून कारखान्याच्या भविष्यासाठी काम करूया.

0Shares
error: Content is protected !!