IHRA News

IHRA Live News

पाचगणी घनकचरा प्रकल्पाचा अनमोल कांबळे यांच्या कडून पर्दाफाश ?

पाचगणी प्रतिनिधीं
नौशाद सय्यद

आज रोजी पाचगणी नगरपालिकेचा पाचगणी शहरातून कचर्याने भरलेला ट्रक हा खिंगर गावाच्या दिशेने जात असताना आम्ही त्याला अडवले आणि पाचगणी शहरामध्ये कचऱ्याच्या माध्यमातून होणारा भ्रष्टाचार चव्हाट्या वरती आणला खरं तर या यंत्रणेमधला हा भ्रष्टाचार थांबणे गरजेचे आहे कारण या पाचगणी नगरपालिके मधली व्यवस्था ही भ्रष्टतेन रंगीत झालेली आहे स्थानिक पत्रकारांना पैसे द्यायचे आणि स्वतःची वाहवा करून घ्यायची परंतु आमच्या सारखे जोपर्यंत प्रखर कार्यकर्ते आहेत तोपर्यंत आम्ही यांचा भ्रष्टाचार हा चव्हाट्या वरती आणणार आहे आणि आम्ही आता हे ही पाहणार आहोत की तो दिल्ली मधला स्वच्छ सर्वेक्षण मधला भामटा अधिकारी ज्याने पाचगणीचे मुख्य अधिकारी गिरीश दापकेकर यांची दिल्लीच्या कचरा विलगीकरणा मध्ये निवड केलेली आहे तो पाचगणी शहरामध्ये कधी येतो म्हणजे आता प्रश्न असा उपस्थित होतो की त्या अधिकाऱ्याने दापकेकर यांच्या कडून असे किती पैसे घेतले की कचरा जाळण्या करिता यांना दिल्लीच्या कचरा विलगीकरण कमिटी वरती त्यांची नेमणूक केली ?आणि त्यांना घेतलं असा असा पडणारा प्रश्न आहे आणि म्हणून आता आम्ही निश्चय केलेला आहे आता लोकांमध्ये अशी चर्चा चालू आहे की जर का पुन्हा हा कचऱ्याने भरलेला ट्रक आम्हाला दिसला तर लोकांच्या जीवाशी खेळण्याच्या अगोदर, लोकांची प्रेत जाण्याच्या अगोदर, या ट्रक लाच जाळून टाकू. कारण या रोगराईने मरण्यापेक्षा रोगराई पसरवणार्याला मरण गरजेच आहे आणि म्हणून अनुचित प्रकार घडू नये कायदा-सुव्यवस्था शाबुत राहिली पाहिजे, लोकांना त्रास होता कामा नये,लोकांच्या जीवाशी खेळता कामा नये,म्हणून आपल्या माध्यमातून तात्काळ एखादी कमिटी नेमा भ्रष्टाचाराची मी तर पोल-खोल केलेलीच आहे तुम्ही देखील तात्काळ दापकेकर यांची चौकशी करा त्या डंपर वाल्याचा डंपर ताब्यात घ्या त्यांच्या वरती गुन्हा दाखल करा ठेकेदारा वरती गुन्हा दाखल करा आणि शासनाने पाचगणी करांना दिलेला पुरस्कार हा परत घ्या अशी प्रतिक्रिया अनमोल कांबळे यांनी पत्रकारांना दिली आहे.

0Shares
error: Content is protected !!