कदिर मणेर/सातारा प्रतिनिधी
कुडाळ-मेढा रस्त्यावर डबडेवाडी जवळ रस्त्यात निर्माण झालेल्या खड्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत अाहे. मेढा हे शहर तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे यारस्त्यावरुन या मार्गाशी संबंधित अनेक गावांचे नागरिक विविध कामानिमित्त दळणवळण करीत असतात.वाहनांची दिवसभर ये-जा होत असते.खड्यामुळे दुचाकी,चारचाकी वाहनचालकांना वाहन चालवताना मोठा अडथळा निर्माण होत अाहे. लक्ष विचलित असलेल्या वाहन चालविणार्या वाहनचालकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने,मोठा अपघात होण्या आधी या खड्याची दुरुस्ती करुन दळणवळणासंबंधी समस्या सोडवावी अशी मागणी वाहन चालक तसेच नागरिकामधुन होत आहे.
कुडाळ-मेढा रस्त्यावरच्या जीवघेण्या खड्यामुळे वाहनचालक त्रस्त..



More Stories
मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून १३ हजार कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा केंद्र शासनाला सादर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली