IHRA News

IHRA Live News

प्रियदर्शनी महिला महाविद्यालय मध्ये ७५ कोटी सूर्यनमस्कार प्रकल्प संपन्न

वर्धा:५:-दिपाली चौहन (जिल्हा वर्धा)

            दि. ५/०२/२२ रोजी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सुरुवातीला प्रार्थना म्हणून सूर्याची नावे घेत तेरा सूर्यनमस्कार घातले. व शेवटी प्रार्थना म्हणून कार्यक्रमाची सांगता केली ,ओंजळ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेद्वारा सुद्धा विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घातले, ओजळ बहुद्देशीय संस्थेच्या संचालिका प्राजक्ता मुते यांनी आपल्या विद्यार्थ्यांकडून रोज नियमीत सूर्यनमस्काराचा सराव करून आज अतिशय सुंदर असे प्रात्यक्षिक सादर केले ,प्राजक्ता , मुते ही आमच्या महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी असून सामाजिक कार्यात हिरीरीने पुढाकार घेत असते. प्राजक्ता गरजु व  होतकरू मुलांचे निशुल्क वर्ग घेते ,तसेच त्या मुलांमधील सुप्त गुणांना चालना देण्याची संधी उपलब्ध करून देते. तिचे स्वागत प्रा. अमोल घुमडे यांनी केले .या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी पोलीस विभागात कार्यरत असलेली सीमा दुबे राष्ट्रीय कबड्डीपटू तसेच अखिल भारतीय पोलीस आर्चरी स्पर्धेत रौप्य पदक पटकावलेलि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती. तिचे स्वागत डॉ. मृणाल बंड यांनी केले

प्रास्ताविके मध्ये क्रीडा विभाग प्रमुख डॉ. सोनाली शिरभाते यांनी सूर्यनमस्कार हा सर्वांगीण सुंदर प्राचीन भारतीय व्यायाम प्रकार असून त्याद्वारे आज आरोग्य सुदृढ बनविता येते तसेच ही व्यायाम पद्धती बिना साहित्य शिवाय ,बिना खर्चाची आहे असे नमूद केले. समाजामध्ये आरोग्यविषयक जनजागृती करावी तसेच विद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्याच्या एकमेव उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असे सांगितले .सूर्यनमस्कार रोज केल्याने शरीर ऊर्जावान व बलवान बनण्यास मदत होते.
कार्यक्रमाची सुरुवात मा जिजाऊ व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ रंभा सोनाये यांनी पुष्प अर्पण करून करण्यात आली.संपूर्ण देशभर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त ७५ कोटी सूर्यनमस्कार संकल्प राबविण्यात येत आहे .राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने सगळ्या महाविद्यालयात एक ते सात फेब्रुवारी या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग तसेच राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी १३ सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकांचे सादरीकरण धुनिवाले मठ चौकात करण्यात आले होते दिनांक १ फेब्रुवारीपासून महाविद्यालयांमध्ये दररोज सूर्यनमस्कार टाकण्यात येत आहेत.
कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रंभा सोनाये, ओंजळ बहुद्देशीय संस्थेच्या सदस्या, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला देवांश राऊत व उदय राऊत यांचे सहकार्य मिळाले.
ओंजळ बहुद्देशीय संस्थेचे पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

0Shares
error: Content is protected !!