IHRA News

IHRA Live News

प्राध्यापिका अंकिता जळीतकांडला 2 वर्षे पूर्ण,९ तारखेला त्याची सुनावणी

दिपाली चौहन /प्रतिनिधी (जिल्हा वर्धा)
प्राध्यापिका जलीतकांड प्रकरणाला दोन वर्षे ओलांडली आहे. या प्रकरणाचा निजल ९ फेब्रुवारीला लागणार असून या कडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. शहरातील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात २ वर्ष चालल्या या खटल्यात सरकारी आणि आरोपी पक्षातर्फे युक्तिवाद २१ जानेवारीला पूर्ण झाला.या खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण २९ साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितिजन्य पुराव्याच्या आधारे न्यायालय या प्रकरणाचा निकाल देईल असा विश्वास अँड उज्वल निकम यांनी व्यक्त केले . प्राध्यापिका अंकिता हिला २ वर्षे पूर्वी २ फेब्रुवारीला हिंगणघाट तालुक्यातील नांदोर चौकात विक्की नगराळे याने पेट्रोल टाकून जिवंत जाळंन्याचा प्रयत्न केला होता.आठ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर तिने १० फेब्रुवारीला अंतिम स्वास घेतला.अंकिता जलीतकांड प्रकरणी पोलिसांनी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्यावर भारतीय दंड विधानानुसार आरोपी निश्चित केले होते.या प्रकरणाचा असर संपूर्ण देशात उमटला होता.गुन्हेगारीला त्वरित फासावर दया , या मागणीसाठी सर्वत्र मोर्चे व निर्देशने केली होती. पीडिता अंकिता व आरोपी हे दोघेही हिंगणघाट तालुक्यातील दरोडा गावातील रहिवासी आहे.शासनाला लोकआग्रहापुढे झुकून या प्रकरणाची चौकशी अत्यांत वेगाने करण्यात आली. या वेळी सरकारी पक्षातर्फे अँड.उज्वल निकम,अँड. दीपक वैध यांनीं भाग घेतला बचाव पक्षातर्फे अँड. भुपेंद्र सोनी शुभांगी कोसार ,अवंती सोने,सुदापे मेश्राम यांनी सहकार्य केले.या प्रकरणाचा निकाल ५ फेब्रुवारीला असून सगळ्यांचे लक्ष वेधले आहे

0Shares
error: Content is protected !!