IHRA News

IHRA Live News

प्रतापगड साखर कारखाना निवडणूक (कारखाना बचाव पॅनल) द्वारे लढवणार:दीपक पवार. कदिर मणेर/सातारा प्रतिनिधीज्या लालसिंग राव शिंदे काका यांनी स्वतःचे रक्त आठवून घाम गाळून साखर कारखाना उभा केला, तो आज गेली पाच वर्ष बंद आहे. इरसे पोटी अथवा राजकारण म्हणून नव्हे तर तालुक्यातील शेतकऱ्यांची गळचेपी पिळवणूक आणि नुकसान थांबवण्यासाठी पॅनल लढवत आहे. कारखान्याविषयी आस्था असलेले उमेदवार उभे करणार आहे.वारसा बघणार नाही. तालुक्यातील सर्व पक्षाचे गटाचे नेते यांचे प्रस्तापित हटवण्यासाठी स्वागत करणार आहे.तालुक्याचा इतिहास पाहता आमच्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांनी कै, वसंतराव करंदीकर यांनी (जावळी सहकारी दूध संघ )स्थापन केला ह-भ-प कळंबे महाराज यांनी तालुक्यातील लोकांसाठी मुंबईमध्ये (जावळी सहकारी बँक) स्थापन केली. त्याच प्रमाणे जावळी तालुक्यामध्ये साहेबराव पवार (भाऊ) यांनी उच्च शिक्षणाची चळवळ सुरू केली. त्याच बरोबर सातारा शहरांमध्ये क्रीडा क्षेत्रातील तालीम उभी करून क्रांती केली. हे सर्व नेते मंडळी कोणाच्याही कामांमध्ये ढवळाढवळ न करता ज्याच्या त्याच्या संस्थेला सहकार्य करत होती.आजवर माझे वडील व आम्ही भावंडांनी कधीही लालसिंग काका व राजेंद्र शिंदे यांनी कारखाना उभा करत असताना हस्तक्षेप अथवा अडथळा निर्माण केला नाही. परंतु सातारच्या आमदारांनी स्वतःच्या बँका वाचवण्यासाठी जावळी सहकारी बँक आमची अस्थिर केली. त्याच बरोबर प्रतापगड साखर कारखान्यावर नजर ठेवून आहेत. म्हणून तालुक्यातील लोकांच्या मालकीचा आणि तालुक्यातील लोकांच्या हातातच हा साखर कारखाना राहणार आहे याकरता पॅनल उभे करत आहे .परिसरातील खंडाळा/ किसनवीर/ व प्रतापगड हे साखर कारखाने बंद असल्यामुळे जाणीवपूर्वक इतर कारखानदार टिंगल टवाळी व गळचेपी करत आहेत.निश्चितपणे या परिवर्तना मधून कारखाना पॅनेल निवडून आल्यानंतर तात्काळ सुरू करणार हा माझा शब्द आहे. सामूहिक प्रयत्न व कोणाबद्दल आकस बुद्धी न ठेवता निवडणूक लढवणार.

0Shares
error: Content is protected !!