IHRA News

IHRA Live News

जावळी तालुक्याला परतीच्या पावसाने झोडपले!

जावळी प्रतिनिधी/कदिर मणेर
जावळी :बुधवारी दुपारी मंदगतीने पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी पाचनंतर मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. तालुक्यात मेढा व परिसरात बुधवारी सायंकाळी ढगफुटीसदृश्य पाऊस पडला आहे.यामुळे अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. रस्त्यांवरील पाणी अनेकांच्या घरात पाणी शिरले होते.
सलग दुसऱ्या दिवशी धुवॉंधार पाऊस पडल्याने सर्वत्र हाहाकार उडाला होता.मेढा मुख्य रस्त्ावरील पुलावरुन पाणी गेल्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली.ओढे व नाले तुडुंब भरून सखल भागांमध्ये पाणी साचले आहे.जोरदार पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
ढगफुटीसदृश्य झालेल्या पावसाने खिंडीलगत असणाऱ्या जुना मेढा रोडवरील दीपावली पुलावरून पाणी जात होते.त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.यामुळे मेढ्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी मोळाच्या ओढ्यावरून लांब पल्याचा वापर करावा लागत होता.हमदाबाज चौकातील मुख्य पूल पाण्याखाली गेल्याने रस्त्यावरून दोन ते तीन फूट पाण्याचे लोट वाहत होते. तसेच कण्हेर अंतर्गत असलेला गणेशनगर येथील ओढ्यालगत असणाऱ्या घरांना पाण्याचा वेढा पडून घरात पाणी घुसले होते. नुकत्याच नव्याने करण्यात आलेल्या सातारा ते मेढा रोडवर अनेक ठिकाणी पाण्याचे तळे साचलेले दिसून आले.मेढा गावातील अंतर्गत रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप येऊन गावातील सुमारे ७ ते ८ घरांमध्ये पाणी घुसले.नाले तुडूंब वाहून अनेक ठिकाणी नाल्यांमधील कचरा रस्त्यावर आला. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांची तारांबळ उडाली.सातारा-मेढा रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांची मोठी अडचण निर्माण होत होती.काही ठिकाणच्या शेतातील सोयाबीन व ऊस पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

0Shares
error: Content is protected !!