IHRA News

IHRA Live News

कुडाळ येथे गणरायाचे जल्लोषी आगमन!

जावळी प्रतिनिधी/कदिर मणेर

कुडाळ : ‘मोरया मोरया,”गणपती बाप्पा मोरया’चा जयजयकार आणि मोठ्या साउंड सिस्टमसह ढोल-ताशांच्या गजरात बुधवारी सायंकाळी कुडाळ शहरातील गणेश मंडळांच्या राजांचे आगमन झाले.

साउंड सिस्टीमचा दणदणाट, फॉग मशीनच्या धुरातील अत्याधुनिक लेसर शोचा झगमगाट, एलइडी लाइटचा थरार आणि रिपरिप पावसातही विविध गाण्यावर बेधुंद होऊन नाचणाऱ्या तरुणाईने कुडाळ परिसरातील सार्वजनिक मंडळांनी जल्लोषी वातावरणात गणेश आगमन.रात्री उशिरापर्यंत ही मिरवणूक सुरू होती.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे शांततेत झालेल्या गणेशोत्सवातील सर्व निर्बंध उठवले. त्यामुळे यंदा कुडाळ परिसरातील श्री गणेश आगमन मिरवणूक जल्लोषात होती, हे निश्चित होत.

बहुतांश सर्वच मंडळांनी साउंड सिस्टीम, डोळे दीपणारा एलइडी लाइट तसेच फोग मशीनमधील धुरामध्ये अत्याधुनिक लेसर शोच्या थराराचे नियोजन केले होते.बाजार चौकात बहुतांश मंडळांनी फटाक्यांची आतषबाजी केली.

सायंकाळनंतर पावसाने रिपरिप सुरू केली, त्याच परिस्थितीत साउंड सिस्टीमच्या गीतावर तरुणाई बेधुंद होऊन नाचत होती. त्यामुळे मार्गावर मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

महिलांचाही सहभाग

अनेक मंडळांमध्ये तरुणांसह महिला व युवती डोक्यावर फेटे घालून नऊवारी साडी नेसून मिरवणुकीत उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.

मिरवणूक पाहण्यासाठी अलोट गर्दी

सायंकाळनंतर पावसाची रिपरिप सुरू झाली होती, तरीही ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. पावसाचा काहीसा जोर वाढल्यानंतर नागरिकांनी दुकानांचा अडोसा घेतला.

पोलीस बंदोबस्त..

संपूर्ण मिरवणुकीत मार्गावर मेढा पोलीस ठाणे,कुडाळ पोलिस चौकीचे अधिकारी फिरून मंडळांना पुढे जाण्यासाठी आवाहन करत होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

जोरदार पावसाने तारांबळ

कुडाळ शहरासह परिसरात बुधवारी सायंकाळी पावसाने झोडपून काढले. तब्बल पाऊण तास एकसारखा पाऊस राहिल्याने गणेश आगमन मिरवणुकीवर परिणाम झाला. साउंड सिस्टमसह गणेशमूर्ती झाकण्यासाठी कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली होती.

0Shares
error: Content is protected !!