IHRA News

IHRA Live News

गांजा रेड मध्ये २६४ किलो गांजासह ३०,०५,२५०/- रू चा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी /दिपाली चौहान (जिल्हा, वर्धा ):- दि.०१-०९-२०२२ रोजी चारचाकी वाहनाने अवैधरित्या गांजाची वाहतूक होत असल्याबाबत मुखबीरकडून खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस स्टेशन कारंजा हद्दीतील बोरगाव (ढोले) फाटा, नॅशनल हायवे क्र. ६ वर नाकेबंदी केली असता मिळालेल्या माहिती प्रमाणे पांढऱ्या रंगाची मारोती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार क्र. एमएच -३१/ सीआर-८५२७ हे चारचाकी वाहन येतांना दिसले. सदर वाहनास थांबवून वाहनाची झडती घेतली असता आरोपी १) कय्युम शहा शहन शहा, वय ३४ वर्ष, रा. रहेमत नगर, बोरगाव (मंजु) त. जि. अकोला, २) शरद बाळू गावंडे, वय ३२ वर्ष, रा. जुनी वस्ती पठाणपुरा, चौक मुर्तीजापूर, जि. अकोला हे त्यांचे ताब्यातील मारोती सुझुकी स्विफ्ट डिझायर या चारचाकी वाहनामधुन शक्कल लढवून कारचे सीटमध्ये बॉक्स करून त्यात व डिक्कीमध्ये गांजा नावाचे अंमली पदार्थाची वाहतुक करतांना मिळाल्याने त्यांचेकडून १) जुनी वापरती पांढ-या रंगाची मारोती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार क्र. एमएच -३१/ सीआर-८५२७ अंदाजे कि. ३,५०,०००/- रू., २) कळया बिया, पाने, फुले यांचा समावेश असलेली ओलसर हिरवट रंगाची कॅनाबिस वनस्पतीची ‘गांजा’ नावाचा अंमली पदार्थ निव्वळ गांजाचे वजन २६५ किलो ३२५ ग्रॅम प्रत्येकी १०,०००/- रू. प्रमाणे २६,५३,२५०/- रु., ३) आरोपीतांचे दोन जिओ कंपनीचे मोबाईल हॅन्डसेट कि. २०००/- रू. असा एकूण ३०,०५,२५०/- रु. चा माल जप्त करुन आरोपी १) कय्युम शहा शहन शहा, वय ३४ वर्ष, रा. रहेमत नगर, बोरगाव (मंजु) त. जि. अकोला, २) शरद बाळू गावंडे, वय ३२ वर्ष, रा. जुनी वस्ती पठाणपुरा, चौक मुर्तीजापूर, जि. अकोला यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन कारंजा येथे अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनात पो.नि. श्री संजय गायकवाड, स्था.गु.शा. वर्धा, पोलीस निरीक्षक श्री दारासिंग राजपूत, यांचे निर्देशाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, पोलीस उपनिरीक्षक गिरडकर मॅडम, पोलीस अंमलदार प्रमोद जांभूळकर, संतोष दरगुडे, हमीद शेख, अनिल कांबळे, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, राजेश तिवसकर, अवि बनसोड, संजय बोगा, दिनेश बोथकर, अनुप कावळे संघसेन कांबळे, विकास अवचट राकेश आष्टणकर, नितीन मेश्राम,मनीष कांबळे, गणेश खेवले, यांनी केली.

0Shares
error: Content is protected !!