IHRA News

IHRA Live News

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्या-आमदार शशिकांतजी शिंदे

जावळी प्रतिनिधि/कदिर मणेर

सध्या राज्यात अनेक ठिकाणी जोराचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले आहे.अतिवृष्टीने शेतीचे व शेतीमालाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना करावयाची मदत या प्रस्तावावर आमदार शशिकांत शिंदे बोलत होते.कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावर तातडीने निर्णय घेत तात्काळ मदत जाहीर करावी ही मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी विधानपरिषदेत केली. मंत्री महोदय असामला गुहाटी येथे गेले होते ते आल्यावर अतिवृष्टी झाल्याने पूरसदृश्य परिस्थितीे निर्माण झाली,महाराष्टा्तील शेतकरी मंत्री महोदयांच्या उत्तराकडे डोळे लावून बसलेले आहेत.त्यामुळे मंत्री महोदयांनी पुढे येवून शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे अशी आग्रही मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली .

मागील वेळी झालेल्या पुराची मदत सुद्धा अजून शेतकऱ्यांना झालेली नाही.रस्ते,पुल वाहून गेलेले दुरुस्त झालेले नाहीत.निर्णय घेत असताना सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावे अशी सर्वसामांन्यांची इच्छा असते,यामुळे सरकार काय निर्णय घेणार आहेत आणि अधिकारी कोण काम करणार आहेत याचा खुलासा करावा तसेच राज्यातील अनेक धरणे आॕगस्ट महिन्यात भरत आहेत असे असले तरी या धरणांमध्ये साधारण तीस टक्के गाळ साठला जातोय यामुळे धरण भरून सुद्धा पाणीसाठा कमी राहतो व मार्च एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्यांना प्रचंड दुष्काळाला सामोरे जावे लागते त्यामुळे अस्तित्वात असलेल्या धरणातून गाळ जरी काढला तरी दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार नाही.मुख्यमंत्र्यांनी सातारा, सांगली ,कोल्हापूर दौरा केला आहे त्यांना ही वस्तुस्थिती समजली असेल तेव्हा तातडीने ही कामे करण्यासाठी निर्णय घेऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली

आता सगळीकडे ढगफुटी होत आहे पूर्वी राज्यात ढगफुटी होत नव्हती दिवसाला ६० मिलिलीटर पाऊस हा निकष असला तरी यामुळे प्रचंड अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे ढगफुटीचा निकष देखील बदलण्यात यावा केंद्र सरकार इतर राज्यात ज्याप्रमाणे मदत करते त्याप्रमाणे त्यांचे विचाराचे सरकार आपल्या राज्यात नसल्याने कदाचित पूर्वी मदत केली गेली नसेल मात्र केंद्राची मदत देखील मागण्यात यावी, इतर राज्यांना अपेक्षेपेक्षा जास्त निधी व आपल्या राज्याला कमी निधी हा दुजाभाव केला जात असेल तर तो होऊ नये अशी मागणी आज विधिमंडळमध्ये शशिकांत शिंदे यांनी केली.

0Shares
error: Content is protected !!