IHRA News

IHRA Live News

मौजे भोसे येथील मालाज फॅक्टरी समोर पाचगणीच्या तत्कालीन नगराध्यक्ष यांच्या समर्थकांकडून अवैधरित्या उत्खनन करून झाडाचे रक्त शोषणे न थांबल्यास उपविभागीय अधिकारी वाई यांच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करणार

पाचगणी प्रतिनिधी नौशाद सय्यद

मौजे भोसे येथील मालाज फॅक्टरी समोर महाबळेश्वर महसूल विभागातील तलाठ्याला हाताशी धरून ज्या प्रकारे अवैधरित्या बेकायदेशीर उत्खनन चालू आहे आणि उत्खननाच्या माध्यमातून वीस वर्षां पूर्वी च्या झाडाला जो तडा देण्याचे काम चालू आहे झाडाच्या साइटुन झाडाची बाजू पोखरून ज्या प्रकारे झाडाचे रक्त शोषण्याचे काम चालू असताना संपूर्ण महसूल यंत्रणा ही या गोष्टीचा तमाशा पाहत बसलेले दिसून येत आहे काही जणांनी तक्रारी केल्या परंतु त्या केवळ कागदावरच राहिल्या आणि म्हणून दुसर्‍या कोणी तक्रारी करू नये म्हणून केवळ 70 हजार ब्रास उत्खनन केलेल असताना केवळ वीस तीस ब्रास चा पंचनामा करायचा आणि पाचगणीच्या कचरा डेपोला उत्खनन केलेली माती आणून टाकलेलं प्रकरण दडवायचं हे काम इथे असणाऱ्या राजकीय धनदांडग्या यंत्रणेकडून चालू आहे आणि म्हणून प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात आवाज उठवणार इथे कोणी नाही आमच्या विरोधात कोण जाणार नाही ही संकल्पना घेऊन चाललेल्या या धनदांडग्यांना शिक्षा करण्याकरिता आम्ही पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्या वाचवण्याकरिता उपविभागीय अधिकारी वाई यांना सोमवार दि 28/2/2022 रोजी उपविभागीय अधिकारी वाई यांना निवेदन देऊन तात्काळ उत्खनन करणाऱ्या लोकांन वरती गुन्हे दाखल करा अन्यथा गुन्हे दाखल न झाल्यास आणि सर्व सामान्यांना एक न्याय आणि धनदांडग्यां राजकीय लोकांना एक न्याय दिल्यास आम्ही उपविभागीय अधिकारी वाई यांच्या दालनासमोर येत्या आठ दिवसात घंटानाद आंदोलन करून या प्रशासनाला जाग आणल्याशिवाय आणि स्थानिक राजकीय धनदांडग्या यंत्रणेच्या मागे असणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शासन केल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही असे अनमोल कांबळे यांनी सांगितले

0Shares
error: Content is protected !!