IHRA News

IHRA Live News

पांचगणी प्रतिनिधी तसलीम मुजावर
NIIT मार्फत IcIc bank पदासाठी मुलाखती
*श्रीमती मीनलबेन मेहता कॉलेज, पाचगणी मध्ये कॉमर्स विभाग व प्लेसमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्पस इंटरव्ह्यू चे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मा.मयूर पाटील टीम लीडर NIIT यांच्या मार्गदर्शनाखाली ICICI बॅकेमधील विविध पदासाठी कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित केले होते. 68 विद्यार्थ्यांनी या कॅम्पस इंटरव्ह्यू साठी नोंदणी केली. त्यापैकी 20 विद्यार्थ्यांनी इंटरव्य्हू दिला त्यापैकी 16 जणांची निवड झाली. या 16 पैकी 5 जणांची अंतिम मुलाखतीसाठी निवड झालेली आहे, ही आपल्या कॉलेज साठी मोठी गौरवाची बाब आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्राध्यापक मकरंद सकटे यांनी केले. यामध्ये त्यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत डॉ. बी.एन.कोकरे यांनी केले. यानंतर मा. मयूर पाटील यांनी मुलाखतीचे स्वरूप सांगितले. त्यांनी Essay writing द्वारे सुरुवात केली, त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखत या पद्धतीने त्यांनी आपले कार्य आज पूर्ण केले. ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले आहे त्या विद्यार्थ्यांची नावे ते काही दिवसातच कळवणार आहेत. अशा विद्यार्थ्यांना रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. आणि यासाठी पॅकेज वार्षिक 2,30,000 रूपये ते 2,70,000 हजार पर्यंत दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण आज पाहायला मिळाले. या कार्यक्रमासाठी कॉलेजचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. बी.एन.कोकरे, डॉ. शहाजी जाधव , डॉ.अनंता कस्तुरे व इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक जयंत शिंदे ,प्लेसमेंट सेल चे सदस्य प्रो. डॉ. राजू गणेशवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.त्याच पद्धतीने वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक प्रशांत सुतार तसेच वाणिज्य विभागाचे प्राध्यापक केदार देशमुख, डॉ. अलीम जाफर, प्राध्यापक स्वप्निल बगाडे यांनी संयोजन केले. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कॉलेजचे आदरणीय प्रभारी प्राचार्य डॉ. सतिश देसाई यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. आभार प्राध्यापक केदार देशमुख यांनी मानले.

0Shares
error: Content is protected !!