IHRA News

IHRA Live News

विक्की उर्फ विकेश नगराळेला आजन्म कारावासाची शिक्षा

दिपाली चौहन / प्रतिनिधी/(जिल्हा वर्धा)
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आज जेव्हा विक्की उर्फ विकेश नगराळे याला नागपूर येथून आणण्याकरिता जवळपास चार गाड्यांचा ताफा त्याच्या मागेपुढे होता.आरोपी न्यायालयाच्या समोर उपस्थित झाल्यानन्तर ११ वाजून ३० मिनिटांनी न्यायालयाचे कामकाजाला सुरुवात झाली.यावेळी न्यायालयाने ३ फेब्रुवारी २०२० ला अंकिता पिसुड्डे हिच्या अंगावर सकाळी पेट्रोल टाकून जाळण्याच्या प्रकरणी दोषी असल्याचे सांगितले होते.अंकिता जळीत हत्याकांड हिंगणघाटची घटना हि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या अंकिता पिसुड्डे जळीत हत्याकांड प्रकरणी आज जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आर बी भागवत यांनी आज या प्रकरणात काल दोषी ठरविलेला आरोपी विकी उर्फ विकेश नगराळे याला आजन्म कारावासाची शिक्षा व पाच हजार रु दंड ठोठावला आहे. आज साय. ५ वाजता न्यायालयाने या बहुचर्चित प्रकरणात आपला निर्णय जाहीर केला.या निर्णयाची माहिती विशेष सरकारी वकील ऍड.उज्वल निकम यांनी न्यायालयाचे बाहेर येऊन प्रसार माध्यमाना दिली.  दरम्यान आज सकाळी ११.०० वाजता न्यायालयाचे कामकाजाला सुरुवात झाली.त्यांनंतर विशेष सरकारी वकील ऍड.उजवल निकम यांनी आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी यासाठी जोर देऊन मच्छी सिंग विरुद्ध पंजाब सरकार व बच्चन सिंग विरुद्ध पंजाब सरकार या मागील निर्णयाचा दाखल देत आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी विंनती केली.
  आरोपीचे वकील ऍड.भुपेंद्र सोने यांनी यावेळी युक्तिवाद करतांना दावा केला की खरा गुन्हेगार हा मोकाट फिरत असून एका निर्दोष युवकाला दोषी ठरविण्यात येत आहे.त्यामुळे सदर प्रकरणी या अभियुक्ताला शिक्षा देतांना सहानुभूतीने विचार करावा अशी विनंती न्यायालयासमोर केली. या दोन्ही बाजूचा युक्तिवाद एकूण घेतल्या नन्तर जिल्हा व सत्र न्यायाधीश न्यायाधीश राहुल भागवत यांनी आरोपीला जन्मठेपची शिक्षा सुनावली. आज या प्रकरणाला दोन वर्षे सात दिवस पूर्ण झाले व दोन वर्षांपूर्वी आजच्या १० फेब्रुवारीला उपचारा दरम्यान अंकिताची प्राणज्योत मावळली होती.व आज तिच्या दुसऱ्या स्मृती दिनी आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे ( वय ३२) याला न्यायालयाने शिक्षा सूनावली हा दुर्दैवी योगायोग आहे. आज या प्रकरणाचा निकाल असल्याने न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.स्वतः जिल्हा पोलिस अधीक्षक श्री प्रशांत होळकर हे जातीने या बंदोबस्तावर नजर ठेवून होते.

हिंगणघाट कोर्ट,अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोलनकी,येथील उपविभागीय अधिकारी दिनेश कदम,ठाणेदार संपत चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.न्यायालय परिसराकडे येणारे सर्व मार्ग बंद ठेवण्यात आले होते. जवळपास १५ पोलीस अधिकारी व १२५ पोलीस न्यायालय परिसरात बंदोबस्तासाठी होते.या शिवाय न्यायालय परिसरात क्यूआरटीचे चार कमांडो तैनात होते.व दंगल निरोधक पथक तैनात ठेवण्यात आले होते.सकाळी ११ वाजता न्यायाधीश श्री आर बी भागवत हे आपल्या आसनावर स्थानापन्न झाले.त्याआधी १० वाजून ५८ मिनिटांनी विशेष सरकारी वकील ऍड.उजवल निकम यांचे आगमन झाले.त्या पाठोपाठ आरोपीचे वकील ऍड भुपेंद्र सोने हे न्यायालयात उपस्थित झाले.त्यांनतर प्रचंड पोलीस संरक्षणात आरोपी विकेश नगराळे याला नागपूर येथून घेऊन पोलीस आले . या वेळी न्यायालयाने ३ फेब्रुवारी २०२० ला अंकिता पिसुड्डे हिच्या अंगावर सकाळी पेट्रोल टाकून जाळण्याच्या प्रकरणी दोषी असल्याचे सांगितले होते. आज या खटल्याचा उत्सुकतापूर्ण निकाल ऐकण्यासाठी प्रसार माध्यमानी न्यायालय परिसरात गर्दी केलेली होती.न्यायालयानचे आजचे कामकाज सकाळी पहिल्या सत्रात ११ ते १२.३० पर्यन्त चालले. सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाने साय ५ वाजेपर्यन्त निकाल राखून ठेवला होता.साय ५ वाजता न्यायाधीश राहुल भागवत यांनी आरोपी व दोन्ही वकील यांच्या समक्ष निकालाचे वाचन करून शिक्षेची घोषणा केली.त्यांनतर सरकार पक्षा तर्फे ऍड.उजवल निकम यांनी सकाळी ११ वाजे पासून न्यायालयाच्या प्रांगणात थेट उभे असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना शिक्षेची माहिती दिली.  
निराश नाही ; वरच्या कोर्टात न्याय मागणार

माझ्या आशिलाला आज न्यायालयाने शिक्षा सूनावून एका निर्दोष व्यक्तीबाबत न्याय केलेला नाही.अंकीताचा खरा मारेकरी मोकाट फिरत असून निरपराध विकेश नगराळेला न्याय मिळवून देण्यासाठीमी सोमवारी हायकोर्टात जाणार असून असंख्य साक्षी पुरावे व पोलिसांच्या तपासाच्या त्रुटी च्या आधारे हायकोर्टात विकेशला नक्कीच न्याय मिळेल असा आशावाद आरोपीचे वकील ऍड. भुपेंद्र सोने यांनी व्यक्त केला.

हिंगणघाट न्यायालयाचा हा एक पहिला ऐतिहासिक निर्णय ठरला

0Shares
error: Content is protected !!