IHRA News

IHRA Live News

“प्रतापगड कारखाना निवडणूक बिनविरोध करावी” ;अा.शिवेंद्रराजे भोसले.

कदिरमणेर/प्रतिनिधी सातारा कुडाळ(जावळी)सभासदांच्या हितासाठी निवडणूक लढवण्याची भाषा करणाऱ्यांच्या मनात एक वेगळेच राजकारण लपले आहे.कारखाना हे फक्त निमित्त आहे. त्यांना आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक दिसत आहे.जर तुम्हाला सभासदांचे हित वाटत होते त्या किसनवीर कडून प्रतापगडचा करार मोडण्यासाठी व कारखाना सुरू करण्यासाठी याआधी का पुढाकार घेतला नाही याचे उत्तर आधी त्यांनी द्यावे असा खडा सवाल करत कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी असे आव्हानही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना केली. प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत संस्थापक पॅनल च्या वतीने निवडणुकीची तयारी सुरू असतानाच जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी कारखाना बचाव यांच्यावतीने निवडणुकीत आव्हान निर्माण केले असून दोन दिवसांपूर्वी त्यांनी अा.भोसलेंवर टिका केली होती.त्याला प्रत्युत्तर देताना दिपक पवार व अा.शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. आमदार भोसले म्हणाले,आर्थिक अडचणीमुळे व नाइलाजास्तव कारखाना ‘किसनवीर’ ला भाडेतत्त्वावर द्यावा लागला. विद्यमान संचालाकांनी तो खासगी तत्त्वावर न देता सहकारात त्याचे अस्तित्व जिवंत ठेवले.त्यामुळेच सभासदांच्या मालकीचा कारखाना राहू शकला. मात्र जे साधे कारखान्याचे सभासदही नाहीत तेच आज कारखान्याची निवडणूक लढवण्याची भाषा करत आहेत. ज्यांच्या स्वतःच्या सहकारी संस्था बाल्याअवस्थेतच बंद पडल्या.त्यांना आज सहकार व सभासदांचे हित जाणवायला लागले आहे.हा सर्व बगल बच्चांच्या सोयीसाठी खटाटोप चालू अाहे. जावळीच्या माजी आमदारांच्या कार्यकाळात जावळी दूध संघ बंद पडला व खासगी दूध संघ सुरू झाला, हे सहकाराला पोषक वातावरण आहे का ? केवळ आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीचा घाट घातला जात असून त्यांना शेतकरी सभासदांचा कसलाही कळवळा नसून केवळ स्वतःची व बगलबच्चांची राजकीय सोय करण्यासाठी कारखान्याची निवडणूक लढविण्याचे षड्यंत्र आहे.जावळीतील ऊस उत्पादकांना ऊस इकडे नेतो, म्हणणार्यांनी आज पर्यंत किती शेतकऱ्यांचा ऊस नेला, याचा शोध घ्यावा, असा उपरोधिक टोलाही आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता अा.भोसले यांनी लगावला.

0Shares
error: Content is protected !!