IHRA News

IHRA Live News

शिरवळ येथे सलग तीन दिवस झाले अपघात मालिका सुरूच

आसिफ मणेर
प्रतिनिधी
कुडाळ पाचवड

सलग तीन दिवस झाले शिरवळ येथे अपघाताची मालिका सुरूच आहे. महामार्गावर अनाधिकृत थांब्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.

आज झालेल्या अपघातात एक गाडी पॅसेंजर साठी अचानक थांबली. मागुन येत असलेल्या खडी घेऊन चाललेल्या डंपरला उजव्या बाजूला वळावे लागले. त्यात बाजूला चाललेल्या कारला जोरात धडक बसली. ही धडक एवढी जबरदस्त होती की उपस्थित नागरिकांचा काळजाचा ठोका चुकला. गाडीचा दरवाजा तोडून लोकांना बाहेर काढले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ज्या गाडीमुळे हा अपघात झाला त्याने मात्र धूम ठोकली.

आशा ठिकाणी लाल दिवे किंवा रिफ्लेक्टर लावण्याची मागणी करण्यात येत आहे. जेणेकरून बेशिस्त वाहाणे येथे थांबणार नाहीत.

याउलट प्रशासनाकडून या बाबींवर कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आज झालेल्या अपघातात नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आणि याच्यावर काही तरी तोडगा काढला जावा अशी मागणी नागरिकांमार्फत केली जात आहे.

0Shares
error: Content is protected !!