IHRA News

IHRA Live News

*पोलिसांकडून मद्यधुंद अवस्थेत शेतकरी कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप*

*पोलिसांकडून मद्यधुंद अवस्थेत शेतकरी कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप*

*कदिर मनेर / जावळी प्रतिनिधी*

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील वडाचे म्हसवे येथील सावंत कुटुंबीयांना काल रात्री मद्यधुंद अवस्थेत पोलिसांनी अश्लील शिवीगाळ करत मारहाण केला असल्याचा आरोप सावंत कुटुंबीयांनी केला आहे यासंदर्भात कुडाळ पोलिस स्थानकामध्ये संबंधित दबंगगिरी करणाऱ्या पोलिसांच्या विरोधात जिल्हा पोलीस प्रमुख यांना तक्रार व निवेदन सावंत कुटुंबीयांकडून देणार असल्याचेही योगेश बाबूराव सावंत यांनी सांगितले या सर्व पोलिसांच्या दबंगगिरी बाबत वडाचे म्हसवे यासह स्थानिक ग्रामस्थांकडून या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे योगेश बाबुराव सावंत यांनी दिलेल्या निवेदनानुसार जावळी तालुक्यातील वडाचे म्हसवे येथे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील असणाऱ्या एका पानंद रस्त्यावरून पोलिसांकडे आलेला तक्रारीवर रात्री सात च्या सुमारास करहर पोलीस स्थानकाचे पीएसआय शिंदे व पोलीस कॉन्स्टेबल व चालक कांबळे रात्री दहाच्या सुमारास सावंत कुटुंबीयांच्या घरी आले सावंत कुटुंबीय स्ट्रॉबेरी बॉक्स भरत असताना त्यांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली व तुमच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे यासाठी तुम्हाला पोलिस स्थानकामध्ये यावे लागेल असे म्हणत योगेश याच्या कॉलरला धरत योगेश सावंत यांना फरफटत गाडीमध्ये बसवले व कुडाळ पोलिस स्थानकामध्ये आणले यासंदर्भात आपण केलेल्या कृत्य चुकीचे असल्याचे पश्चाताप झाल्यानंतर योगेश सावंत यांना कुडाळ पोलिस स्थानकाच्या समोर त्यांनी गाडीतून ढकलून बाहेर हाकलले आणि तिथेच सोडून करहर पोलीस स्थानकाचे पीएसआय व पोलीस व्हॅन चे ड्रायव्हर कांबळे हे निघून गेले दरम्यानच्या काळात योगेश बाबुराव सावंत यांची पत्नी शितल योगेश सावंत व त्यांच्या सहा वर्षाची लहान मुलगी तिला देखील मारहाण केली असल्याची तक्रार व आरोप योगेश सावंत यांनी केला आहे संबंधित मुलगी तिच्या अंगावर मार लागलेल्या च्या जखमा असून तिला पुढील उपचारासाठी कुडाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले आहेत दरम्यान या संदर्भात जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे आपण पोलिसांच्या या दबंग गिरी तू चुकीच्या कृत्याबाबत न्याय मागणार असल्याचेही सावंत कुटुंबियाकडून सर्जेराव विष्णू सावंत शितल योगेश सावंत रामदास विष्णू सावंत शंकर नाना सावंत शालन मारुती सावंत सुरज रामदास सावंत प्रतिभा शिवाजी शिर्के किरण शिवाजी सावंत संदीप अशोक सावंत यांनी याबाबत निवेदनावर स्वाक्षऱ्या देखील केले आहेत.

0Shares
error: Content is protected !!