वर्धा: ७/०१/२०२१:–दिपाली चौहन(जिल्हा वर्धा)
ख्यातनाम गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लतादीदींच्या जाण्याने झालेला शोक शब्दात व्यक्त केला आहे.
“लतादीदींचं जाणं त्यांच्या जगभरातील कोट्यवधी चाहत्यांसाठी अतिशय दु:खद आहे. त्यांच्या गाण्यातील वैविध्य, दैवी सूर यांनी अनेक पिढ्यांना आनंद दिला. त्यांनी आवाजातून भारताचं सौंदर्य मांडलं.
भारतरत्न लतादीदींची कारकीर्द कालातीत आहे. शतकातून एकदा असा कलाकार जन्म घेतो. माणूस म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व भारावून टाकणारं होतं.
दैवी आवाज आपल्याला सोडून गेला आहे ,पण त्यांची गाणी चाहत्यांच्या मनात रुंजी घालत राहतील.
ओंजळ बहुउद्देशीय संस्थेतर्फे सुद्धा त्यांच्या मुलांसोबत फुले अर्पण करून श्रद्धांजली देण्यात आली.
श्रद्धांजली अर्पण करताना अतिशय भाऊक असा क्षण होता.
ओंजळ बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा कु.प्राजक्ता मुते यांनी गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या संघर्षमय जीवनाची कहाणी सांगून संपूर्ण देशाला अशी लतादीदी होणार नाही असे संबोधित केले,. या
अनुषंगाने आज श्रद्धांजली अर्पण करून पसायदान व मोंन अर्पण केले.
संस्थेचे सचिव मनोज उईके व संस्थेच्या कोषाध्यक्ष श्रद्धा लुगे येरावार यांनी लतादीदी विषयी असलेल्या बालपणीच्या गोष्टी व संगीत क्षेत्रात कशा पद्धतीने स्वतःला पुढे घेऊन गेल्या याचे महत्त्व पटवून दिले.
ओंजळ संस्थेचे पदाधिकारी व संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी श्रद्धा लुंगे येरावार , दीप्ती चव्हाण अरशिया बेग,आलोक भारोटे, हर्षल परतेकी, आदित्य यूवनाते , कृष्णा डोंगरे इत्यादी सदस्यगण उपस्थित होते.
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ