IHRA News

IHRA Live News

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार प्रशासन द्वारा उष:काल बालगृह वर्धा येथे जागतिक मानवाधिकार दिन साजरा

वर्धा ११:- प्रतिनिधी / दिपाली चौहान
दि.१०/१२/२१ रोजी जागतिक मानवाधिकार दिवस या दिनानिमित्य अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद ,जिल्हा वर्धा व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार प्रशासन यांच्या संयुक्त विद्यामानाने उष:काल बालगृहाच्या सभागृहात भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमा मध्ये अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेच्या अध्यक्ष मा. डॉ. सौ.उषाताई फाले हे कार्यक्रमा मध्ये अध्यक्ष पदी उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद वर्धा.येथील सहसचिव मा.श्री स्वप्नील मानकर ,मा.सहा.पोलिस निरीक्षक महेंद्र इंगळे व मा.सहा.पोलिस निरीक्षक मेघाली गावंडे,मूक बधिर शाळेचे शाळा प्रमुख मा.ज्योती लोखंडे, व तेथील शिक्षक मा. मंगेश सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन आंतरराष्ट्रीय मानवधिकार प्रशासन येथील जिल्हा अध्यक्ष मा.सौ.दिपाली चौहान यांनी केले.तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक आंतरराष्ट्रीय मानवधिकार प्रशासन येथील विदर्भ अध्यक्ष मा.श्री निखिल हरणे यांनी दिले . त्यांनीं मानवाधिकार म्हणजे काय त्यात कोणते कार्य केले जातात इत्यादी गोष्टी बालकांना व कर्मचाऱ्यांना सांगितले .कार्यक्रमाला नागरिकांची व बालकांची उपस्तिथी भरपूर प्रमाणावर होती. सदर कार्यक्रमाला मा. फाले मॅडम यांनीं ग्राहक कायदा व ग्राहकाची होणारी फसवणूक यावर मार्गदर्शन केले,तसेच मानवाधिकार दिनानिमित्य त्यांचे कायदे व अधिकार याची माहिती देऊन शुभेच्छा दिल्या ,या प्रसंगी शैला दाते,सोनाली भोयर,आदेश राठोड,व इतर नागरिक उपस्थित होते .कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात पाहुण्यांचे आभार मा.श्री सागर घाटे यांनी व्यक्त केले,त्यानंतर सर्व बालकांना खाऊ वाटप करण्यात आले.

0Shares
error: Content is protected !!