सातारा प्रतिनिधि/कदिर मणेर
महागाईमुळे जनतेतून तयार होतोय रोष
जावळी प्रतिनिधि/कदिर मणेर
जनतेपुढे ‘अच्छे दिन’चे स्वप्न ‘जैसे थे’ बहुत हुई महंगाई की मार,काळा पैसा अाणून पंधरा लाख खात्यावर असेच जमा होतील.अशा बर्याच वल्गणा,कल्पणा रंगवून सत्तेत अाले.पण प्रत्यक्षात या सरकारने देशातील शहरी असो ग्रामिण भाग असो मध्यमवर्गीयांचे जगणे मुश्कील केले आहे.गेल्या पाच वर्षांत ना महागाई कमी झाली,ना बेरोजगारीचा प्रश्न दूर झाला.उलट मध्यमवर्गीयांच्या स्वयंपाकघरात महागाईचा स्फोट होऊन अशी अवस्था झाली अाहे.’आमदनी अठ्ठन्नी,खर्चा रुपय्या’चे गंभीर चित्र असून मध्यमवर्गीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
केंद्रातील सरकारने अलीकडच्या काही महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला उच्चांकी पातळीवर नेऊन ठेवले.त्यामुळे देशात महागाईचा मोठा भडका उडाला आहे.त्याचा दाह कमी होत नाही तोच आधी व्यावसायिक सिलिंडर महाग केला व त्यापाठोपाठ स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत 50 रुपयांची वाढ केली.गेल्या पाच वर्षांत एकीकडे या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती जवळपास दुपटीने वाढल्या,तर दुसरीकडे सर्वसामान्यांचे उत्पन्न घटले.आधीच कमाईची विवंचना,त्यात वाढत्या महागाईच्या जात्यात जगणे भरडले आहे.त्यामुळे आता जगायचे कसे,असा संतप्त प्रश्न मध्यमवर्गीयांकडून सरकारला केला जात आहे.
देशात भाजपाचे सरकार येण्याआधी म्हणजेच मार्च 2014 मध्ये घरगुती सिलिंडरची किंमत 410 रुपये होती.सबसिडीही मिळत होती त्यावेळी हेच विरोधात होते रस्त्यावर येवून अा़दोलन करत होते.जनतेच्या साठी घसा ओरडून महागाई बद्दल बोलत होते.आता आठ वर्षांनंतर त्याच सिलिंडरची किंमत अडीच पटीने वाढून 1053 रुपयांवर गेली आहे.शिवाय सबसिडी देणे बंद केले आहे.अगोदरच पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त अाहेत या सर्वांचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होत असतो.वाढत्या महागाईने सामान्य नागरिक बेजार झालेला अाहे.मात्र केंद्र सरकार महागाई कमी करण्या ऐवजी नेहमी नवे दर जाहिर करुन सर्वसामान्यांना एकामागून एक धक्का देत अाहे.पहिले विरोधात होते तेव्हा त्यांना महागाई वाटत होती परंतू आज सत्तेत असताना त्यांना जनतेच्या महागाईच्या मरण यातनेवर बोलायला कोणीही तयार नाही.महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य जनतेला आणखी दरवाढीचे चटके बसत आहेत.सततच्या दरवाढीमुळे वर्षभरात गॅस सिलेंडर तब्बल 244 रुपयांनी महागला आहे.
पाच वर्षांतील आलेख जर अापण बघीतला तर सिलिंडरची किंमत 6 जुलै 2017 – 564 रुपये 6 जुलै 2022 – 1053 रुपये.अाज या महागाईमुळे जनतेतून खुप संतप्त प्रतिक्रिया निघू लागल्या अाहेत.
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ