IHRA News

IHRA Live News

राजकारण न करता जावऴी बँकेची निवडणूक बिनविरोध पार पाडू:माजी मंत्री. अा.शशिकांत शिंदे

सातारा प्रतिनिधि/कदिर मणेर

जावऴी:सर्व राजकीय इच्छा अाकांशा बाजूला ठेवून राजकारण न करता जावळी बॅंकेची निवडणूक बिनविरोध पार पाडू असे माजी मंत्री, अामदार शशिकांत शिंदे यांनी जावळी करांना अावाहान केले.जावलीच्या सहकाराची माय माऊली दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बॅंकेच्या अागामी निवडणूकीत सर्वांनी अापल्या राजकीय हेतूला महत्व अाकांशाला बाजूला ठेवून संस्थेच्या भल्यासाठी अापण सर्वांनी ही निवडणूक एकत्रीतपणे बिनविरोध पारपाडू या असे अावाहन निवडणूकीतील इच्छूक उमेदवाराला केले अाहे.

बॅंकेत निवडणूकीच्या 17 जागेसाठी 89 उमेदवार उभे ठाकले असून यातून मार्ग काढून दत्तात्रय कळंबे महाराज यांनी स्थापन केलेली ही बॅंक बिनविरोध करण्यासाठी अाज मुंबई येथे विशेष बैठकीचे अायोजन करण्यात अाले होते.यावेळी शशिकांत शिंदे मार्गदर्शन करत होते.यावेळी वाई,खंडाळा महाबळेश्वर मतदार संघाचे अामदार मकरंद अाबा पाटील, माजी अामदार सदाभाऊ सपकाळ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जेष्ठ नेते बाबूराव संपकाळ, अमितदादा कदम, बॅंकेचे माजी अध्यक्ष विक्रम भिलारे, चंद्रकांत गावडे, योगेश गोळे, राजाराम अोंबळे, माजी उपाध्यक्ष प्रकाश मस्कर,भानुदास गावडे, विनोद कळंबे, रविंद्र परामणे,भानुदास जाधव,पार्टे,व अर्ज भरलेले उमेदवार यावेळी उपस्थित होते. यावेळी अा.मकरंद पाटील म्हणाले सहकार शेत्र अडचणीत असून बॅंकेला निवडणूक परवडणारी नाही.अाणि त्यात वादावादी करण्यापेक्षा तज्ञ व अभ्यासू उमेदवारांची निवड करुन ही निवडणूक बिन विरोध करु यासाठी सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन केले.वसंतराव मानकुमरे म्हणाले दत्तात्रय कळंबे महाराज बॅंक ही अापली अस्मिता अाहे कोणी हट्ट करुन निवडणूक लादू नये असे म्हटले.यावेळी अनेकांनी अापल्या भाषणात अापल्या भावना व्यक्त केल्या.या बैठकीतून सर्व उमेदवारांना नेत्यांनी बिनविरोध निवडणूकीचा मोलाचा सल्ला दिला अाहे.त्यामुळे या नेत्यांच्या अावाहानाला कितपत फायदा होतोय हे अागामी काळात कळणार अाहे.जावळी सहकारी बॅंक ही दत्तात्रय कळंबे महाराज यांनी स्थापन केली आहे. जावळीकरांच्या अस्मितेची ही एकमेव संस्था असून ती टिकवण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र अाल्याने या निवडणूकीचे चित्र काय असेल हे अागामी काळात समजणार अाहे.इच्छूक उमेदवारांची संख्या अाणि अर्ज भरणार्या उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नेत्यांच्या या सल्याला हे उमेदवार किती विचार करतात याचा विचार करणे गरजेचे अाहे.

0Shares
error: Content is protected !!