IHRA News

IHRA Live News

संजीवन विद्यालय पाचगणी चे शंभरावे वर्ष उत्साहात साजरे !

पाचगणी प्रतिनिधि/नौशाद सय्यद
ब्रिटिश काळापासुन आपल्या उत्तम दर्जाच्या शिक्षणाने शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या संजीवन विद्यालय
पाचगणी या शाळेचा शंभरावा वाढदिवस दिनांक काल दिनाक- 3 जुलै रोजी पार पडला.
1922 मध्ये पंडित बंधुंनी सुरु केलेली ही शाळा आज ही आपले अस्तित्व टिकवून आहे.दोन दिवस चाललेल्या या रोमांचक सोहळ्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून व अगदी परदेशातून ही माजी विध्यार्थी आवर्जून उपस्थित राहिले होते.

अगदी अल्प दरात गोरगरीबांच्या मुलांना शिकवणारी शाळा म्हणून शिक्षण क्षेत्रात संजीवन चे नाव निघाल्या शिवाय राहत नाही.
शाळेने आज पर्यंत आपल्या माजी विध्यार्थ्यांनमधून समाजाला उत्तम डॉक्टर, वकील, कलाकार, उद्योजक दिलेत. या सर्व माजी विध्यार्थ्यांच्या यशस्वी होण्यामध्ये संजीवन चे संस्कार व शिक्षण उपयोगी पडले असे मनोगत सर्वांनी व्यक्त केले.

संजीवन ला पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐

0Shares
error: Content is protected !!