दिपाली चौहन /प्रतिनिधी/ (जिल्हा वर्धा)माजात जगत असतांना समाजाचं काही देणं असतं, याच कर्तव्यभावनेतून एका आईने मुलाला म्हटले की, माझ्या मृत्यूनंतर तेरवी साजरी न करता त्याऐवजी अनाथाश्रमात किंवा वृद्धाश्रमात दान देऊन सामाजिक कार्य करशील.
अखेर मुलगा श्री.नितीन यादवराव बांगडे यांनी कृष्ठधाम, दत्तपूर येथे कुष्ठरोग्यांना अन्नदान तसेच संस्थेस किराणा देऊन स्वर्गवासी आईची इच्छा पूर्ण केली.
स्वर्गीय श्रीमती शोभाताई यादवराव बांगडे या विद्या विकास महाविद्यालय, समुद्रपूर येथे ‘शिपाई’ पदावर कार्यरत होत्या. त्यांचे दि. 6 जानेवारी 2022 ला दुःखद निधन झाले. त्यांनी आपल्या विचारातून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.
सदर कार्यक्रमात मुलगा नितीन याने स्वर्गीय आईचे विचार उपस्थित मान्यवरांसमोर व्यक्त केले.
शेवटी स्वर्गीय श्रीमती शोभाताई यादवराव बांगडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून दोन मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाला कृष्ठधाम, दत्तपूर येथील व्यवस्थापक मा.श्री.शुक्ला साहेब तसेच इतर कर्मचारीवर्ग, नातेवाईक सौ.इंदूताई विठ्ठलराव झाडे, भाऊ श्री.सुरेशजी टापरे, जावई श्री.रविंद्रजी बंडे, श्री.अजयराव सालोडकर, बांगडे कुटुंबीय व लाभार्थी(कृष्ठरोगी) उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मा.श्री.स्वप्नील वैरागडे सर यांनी केले.
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ