IHRA News

IHRA Live News

,RESPECT लघुचित्रपटाचे ऑडीशन संपन्न


वर्धा -18 :- प्रतिनिधी /दिपाली चौहान

आधुनिक काळात महिला विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आहे. असे कोणतेच क्षेत्र उरले नाही ज्यात महीला मागे आहेत. सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात महिला महत्त्वपुर्ण योगदान देत आहे असे मत औंजळ बहुउद्देशीय संस्था वर्धा चे संस्थापिका प्राजक्ता मुत्ते यांनी व्यक्त केले. BRB production house वर्धा आणि औंजळ बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्तने या लघुचित्रपटाचे ऑडीशन चे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी BRB production house वर्धा चे अध्यक्ष भुषण भोयर , उपाध्यक्ष गणेश धांदे ,औंजळ बहुउद्देशीय संस्था चे संस्थापिका प्राजक्ता मुत्ते , लायन्स क्लब गांधी सिटी वर्धा चे संचालक अनिल नरेडी, सामाजिक कार्यकर्ते विकास फटींगे , पवन तिजारे, दिलिप रोकडे, जीवन बांगडे, आशिष पोहाणे, मोहन सायंकाळ, दक्ष फाउंडेशन चे प्रकाश खंडार, BRB Prodution house चे सदस्य हर्ष तेलंग , समबुद्धा घ्यायवाने , हर्ष महाजन , तन्वी ठोंबरे , शिवानी देठे , कोमल देठे , अर्शिया बेग , दीप्ती चव्हाण ,सुमीत इवनाते , भूषण कांडे , श्रेयस गांजरे , सुरज तांमगाडगे , भुषण टाकसांडे , नंदा पेटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आधुनिक काळात महिला अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी BRB Production House ” RESPECT “या लघु चित्रपटाची निर्मिती करणार आहे. 16 ऑक्टोबर ला RESPECT या लघु चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर स्वराज ठाकूर , आयुषी चांदेकर आणि पियुष मांढरे यांच्या उपस्थितीत ऑडिशन पार पाडण्यात आले. या चित्रपटाचे दिग्दर्शन भूषण भोयर करणार आहे.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी भूषण भोयर, हर्ष महाजन,मनोज कुमार , श्रद्धा ताई , भूषण कांडे ,श्रेयस गांजरे,शिवानी देठे , कोमल देठे, गणेश धांदे, हर्ष तेलंग,नंदा पेठकर , तन्वी ठोंबरे, अर्शिया बेग, दीप्ती चव्हाण, उदय पेंदाम, समबुद्धा घ्यायवाने, भूषण ताकसांडे, प्रथमेश बाकरे, सुरज तमगाडगे यांनी परिश्रम घेतले.

0Shares
error: Content is protected !!