IHRA News

IHRA Live News

भारतीय जनता पार्टी जिल्हा महिला मोर्चा वर्धाकडून अंगणवाडी कडे

वर्धा 14:- प्रतिनिधी /दिपाली चौहान

आज नालवाडी येथे
भारतीय जनता पार्टी जिल्हा महिला मोर्चा वर्धाकडून अंगणवाडी क्रमांक 59 येथे अन्न प्राशन आणि माता तसेच लहान मुलांना आहार, आरोग्य यावर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला…..
आदर्श अंगणवाडी अभियानाअंतर्गत या
कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत सदस्या व भाजपा महिला आघाडी जिल्हा चिटणीस प्रतिभा वाळके यांचे वतीने करण्यात आले,
प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अर्चनाताई वानखेडे, भाजपा महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा वैशालीताई येरावार, माजी अध्यक्षा मंजुषा ताई दुधबळे, जिल्हा सचिव चेतना कांबळे, ओबीसी महिला सयोंजिका वर्षाताई बोकाडे, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा ताई मोहोड, cho डॉ. आसोले मॅडम, ग्रामपंचायत सदस्या सुनिता तडस, महिला सदस्या वंदना पाटील निकिता पाटील , माधुरी मेंढेवार यांच्या उपस्थितीत प्रथमतः क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तसेच जीजाबाई आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटोला माल्यार्पण करून वंदन करण्यात आले, 6 महिन्याच्या बाळाला खिचडी खावू घालून अन्न प्राशन करण्यात आले, यावेळी cho डॉ आसोले मॅडम यांनी लहान मुलांचेआणि आईचे आरोग्य वर मार्गदर्शन केले .. वैशालीताई यांनी पोषण आहार कसा घ्यावा याविषयी मार्गदर्शन केले , तसेच अर्चनाताई यांनी लहान मुलांची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले, संचालन आणि प्रास्ताविक प्रतिभा वाळके यांनी तर आभार प्रदर्शन अंगणवाडी सेविका अनिता भांनसे ताई यांनी केलं… लहान मुलांना केळी राजगिरा लाडू , तसेच चिवडा आणि पौष्टिक नाष्टा वाटप करण्यात आला
यावेळी अंगणवाडी सेविका सुवर्णा कोपरकर सेविका,
उज्वला माटे मदतनीस
माया जुंनगडे आशा वर्कर , नीलिमा लाडवन आरोग्य सेविका, अर्चना भगत आरोग्य सेविका,अतुल शेंडे आरोग्य सेवक ,नालवाडी परिसरातील महिला उपस्थित होत्या…..

0Shares
error: Content is protected !!