IHRA News

IHRA Live News

सुप्रसिद्ध अभिनेता अली खान यांच्या हस्ते औंजळ बहुउद्देशीय संस्था सन्मानित

एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित महात्मा गांधी विचार संमेलनामध्ये कार्यक्रमाचे उद्घाटक सुप्रसिद्ध बाॅलीवुड अभिनेता मा. अली खान व जय महाकाली शिक्षण संस्थेचे मा. पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री सर व शार्ट फिल्म एक्टर अरबाज खान व इतर मान्यवरांच्या हस्ते वर्धा जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात सतत कार्यरत असलेली औंजळ बहुउद्देशीय संस्थेचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार स्विकारतांना संस्थेचे संपुर्ण सदस्यगण उपस्थित होते.

मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितचं आहे,की गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याचे कार्य औंजळ बहुउद्देशीय संस्था करित आहेत.

अशा सन्मानातून आम्हाला अजून नवीन उपक्रम राबविण्याची उर्जा निर्माण होते.
त्याबद्दल एकता सेवाभावी संस्थेचे औंजळ बहुउद्देशीय संस्थेमार्फत आभार

0Shares
error: Content is protected !!