IHRA News

IHRA Live News

किड्स फाउंडेशन आयोजित मोबाईलच्या दुनियेत बालक – पालक कार्यशाळा संपन्न


वर्धा 4:- प्रतिनिधी / दिपाली चौहान

दिनांक 2 ऑक्टोंबर २०२२ला महात्मा गांधीजी तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त किड्स फाउंडेशन, वर्धा यांनी मोबाईलच्या दुनियेत बालक – पालक हे वर्कशॉप वर्धा जिल्ह्यातील मुलांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी आयोजित केले होते.
मोबाईलच्या दुनियेत बालक पालक ही कार्यशाळा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वर्धा या ठिकाणी दुपारी 1.30 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत घेण्यात आली होती.
या अंतर्गत मोबाईल विद्यार्थ्यांचा मित्र की शत्रू, मोबाईलचा शिक्षणात वापर, मोबाईल वापरताना संभाव्य धोके, मोबाईल मी कसा वापरावा, मोबाईलचा सुरक्षित व मर्यादित वापर कसा करावा NEET आणि Jee साठी मोबाईलचा वापर करता येईल का?, मुलांच्या मोबाईल वापरा संदर्भात पालकांना चिंतामुक्त कसे होता येईल, तसेच बालक – पालक यांच्या मोबाईल संदर्भात इतर प्रश्नांचे समाधान या कार्यशाळे मध्ये करण्यात आले होते. या अंतर्गत अनेक शैक्षणिक वेबसाईट ॲप्स, kahoot Quiz, सायबर सेफ्टी अँड सेक्युरिटी, मोबाईल आणि मुलांची सायकॉलॉजी, मुलांसाठी स्क्रीन टाईम किती आणि कसा असावा या विषयांवर प्रात्यक्षिक पद्धतीने कार्यशाळा घेण्यात आली होती.
मोबाईलच्या दुनियेत बालक पालक या कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून श्री लिंबाजी सोनवणे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद वर्धा, प्रमुख अतिथी म्हणून राहुल कन्नाके सायबर तज्ञ तथा तपासी अधिकारी दहशतवाद विरोधी पथक, नागपूर व श्री राजेंद्र मस्के शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती वर्धा उपस्थित होते.
सदर प्रशिक्षणाचे संचालन श्री पवन बानकर यांनी केले, प्रास्ताविक डॉ. गिरीश वैद्य तसेच kahoot Quiz व मोबाईलचा वापर कसा करावा या संदर्भात मार्गदर्शन निलेश ढोकणे, शैक्षणिक वेबसाईट, ॲप्स, फॅमिली लिंक या संदर्भात मार्गदर्शन शरद ढगे (IT SRG मेंबर CIET, NCERT दिल्ली), मोबाईल सुरक्षितता सायबर सेफ्टी या संदर्भात मार्गदर्शन राहुल कन्नाके व स्वप्निल वैरागडे(IT SRG मेंबर CIET, NCERT दिल्ली) मोबाईल व मुलांची मानसिकता या संदर्भातील मार्गदर्शन कमलेश पिसाळकर, (मानसशास्त्रज्ञ) यांनी केले.
Kahoot Quiz अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व द्वितीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. तसेच सहभागी सर्व पालक व बालकांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीष जगताप, गजानन वैद्य उल्हास राठोड, मीनल गिरडकर, प्राजक्ता मुते, भूषण थुटे व इतर किड्स फाउंडेशन सदस्य यांचे सहकार्य लाभले.

0Shares
error: Content is protected !!