IHRA News

IHRA Live News

गणेश गजराने जावळी दुमदुमली ! लाडक्या बाप्पाला भक्तीपुर्ण निरोप !

जावळी प्रतिनिधी/कदिर मणेर.
जावळी : ‘निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी’ अशी बाप्पाकडे भावना व्यक्त करत आज रोजी शुक्रवारी घरगुती गणरायाला भक्तीपूर्ण निरोप दिला.

विघ्नहर्ता गणेशाची यंदा घरोघरी मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली होती.दहा दिवस रंगणाऱ्या भक्तीच्या या मेळ्यामुळे सर्वत्र आनंदी वातावरण पसरले होते.गणरायाची मनोभावे पूजाकरून भक्तांनी घरगुती बाप्पांना निरोप दिला.सकाळ पासून नदीकाठी नागरिक मूर्ती विसर्जनासाठी येत होते. सायंकाळी पाच नंतर कुडाळ,करहर,सायगाव,मेढा शहरातील काही सार्वजनिक मंडळाकडून पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. गणेश भक्तांकडून ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करण्यात आला. या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी पाऊस पडत असताना देखील जागोजागी नागरिक तसेच महिला यांनी बाजारपेठेत गर्दी केली होती.

पोलिस प्रशासनाकडून वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये याचे चोख नियोजन करण्यात आले होते. पोलिसांनी केलेल्या उत्तम नियोजनामुळे मिरवणूक सोहळ्यात कोणताही अडथळा निर्माण झाला नाही.

0Shares
error: Content is protected !!