IHRA News

IHRA Live News

वेध गणेशाचे,जावळीमध्ये तयारीला वेग !

जावळी प्रतिनिधी/कदिर मणेर

गणेशोत्सव अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपला आहे.त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपती बसवण्यासाठी शेड उभे करण्यास प्रारंभ केला आहे.तर कुंभारवाड्यात गणेशमुर्तींना सजवण्याच्या कामालाही गती आली आहे.गणेश मुर्ती बुकिंग करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक कुंभारवाड्यात जाऊ लागले आहेत‌.

दोन वर्षे गणेशोत्सवावर कोरोणाचे सावट होते. त्यामुळे गणेशोत्सव उत्साहात साजरा करता आला नव्हता.त्यामुळे यावर्षी गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जाणार आहे.गणेशोत्सवामुळे जावळी तालुक्यातील बाजारपेठ असणारी केळघर,मेढा,सायगाव,कुडाळ,करहर या भागातील बाजारपेठ गणेशोत्सवामुळे ठिकठिकाणी सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने फुलून गेली आहेत.चायनीज लाईटच्या माळा, रंगीबेरंगी प्लास्टिक फुलांच्या माळा,रंगीत चकाकणाऱ्या कागदांच्या आकर्षक माळा,गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत.जावळीतील कुंभारवाड्यात उत्सवासाठी सहा महिन्यापासून सुरू असणारे मुर्तीकरांचे काम अंतिम टप्यात आले आहे.मंडळासाठी लागणाऱ्या मोठमोठ्या मुर्तींना अखेरचा हात फिरवून त्या वेळे आधीच पूर्ण करण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू आहे.घरगुती गणपतीसाठी लागणाऱ्या मूर्ती मोठ्या संख्येने तयार झाल्या आहेत.मूर्ती आकर्षक वैशिट्यपूर्ण असल्याने त्यांना जावळी परिसरातील अनेक गावातून मोठी मागणी आहे.त्यामुळे कुंभार वाड्यामध्ये गर्दी होऊ लागली आहे.यंदा गणेश मूर्तीची किंमत कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती आणि महागाई यामुळे किंमती मध्ये वाढ झाली आहे.

0Shares
error: Content is protected !!