IHRA News

IHRA Live News

गुटखा बंदी,तरी गुटख्याची ठिकठिकाणी रंगपंचमी;

गुटखा बंदी,तरी गुटख्याची ठिकठिकाणी रंगपंचमी;

जावळी प्रतिनिधि/कदिर मणेर

कोरोना महामारीचा सर्वच क्षेत्रातील व्यावसायिकांना फटका बसला असला तरी,अवैध गुटखा विक्री करणारे मात्र यास अपवाद आहेत.कारण बंदी असतानाही दिवसाढवळ्या गुटखा विक्रीचा गोरखधंदा जोरात सुरू आहे. गल्लोगल्ली पानटपऱ्या तसेच किराणा दुकानांवर गुटखा सहज उपलब्ध होतो.विशेष म्हणजे ही बाब प्रशासन जाणून आहे,मात्र तरी चिरीमिरी मिळत असल्याने, त्यांनी झोपेचे सोंग घेत विक्रेत्यांना गुटखा विक्रीचे जणू काही अप्रत्यक्षरीत्या परवानेच बहाल केले आहेत असे आता नागरिकांमधून बोलले जात आहे.

अन्नसुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत राज्यात गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातली आहे.बंदीची चोख अंमलबजावणी करण्याकरिता अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.मात्र,सद्यस्थितीत दोन्ही यंत्रणा ढिम्म असून,विक्रेते मात्र सुसाट आहेत.महाराष्ट्रात चोरट्या मार्गाने गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करून त्याची विक्री केली जाते.गुटखा विक्रेत्यांचे नेटवर्क इतके मजबूत आहे की,प्रशासनालाही त्यांनी या व्यवसायात एक प्रकारे भागीदारच बनविले आहे का असा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे.

गुटख्याचा सर्वाधिक ग्राहक हा तरुणवर्ग आहे.बंदी असल्याने, विक्रेते ‘अवाच्या सवा’ किंमत आकारून गुटख्याची विक्री करीत आहेत.शाळा-महाविद्यालय परिसरातदेखील गुटखा विकला जात असल्याची धक्कादायक बाब यापूर्वीदेखील समोर आली आहे.अशात अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांनी धडक कारवाई करून गुटखा बंदीवर अंमलजावणी करावी,अशी मागणी लोकांनमधून केली जात आहे.

प्रशासनाच्या या दुर्लक्षतेमुळे गुटखा विक्रेत्यांचे फावत असून, त्यांच्याकडून सर्रासपणे गुटखा विक्री सुरू आहे.परिसरात गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे प्रमाण वाढत आहे.
गुटखा खाणारे चारचाकी, दुचाकी, बस, रिक्षा आदी वाहनांमधून बिनधास्त खाली थुंकतात. कोणाच्या अंगावर जाईल याचेही अनेकजणांना भान नसते. अनेक जण रस्ता थुंकण्यासाठीच आहे असे समजून रस्त्यावर सडा टाकल्यासारखे चालता चालता थुंकतात.

एसटीबस स्थानक,परिसरात राजरोस असे प्रकार चालतात. अनेक कार्यालयाच्या परिसरात कोप-यात, जीन्यात बिनधास्त थुंकतात काही कर्मचारीही गुटखाखाऊन थुंकतात. यामुळे परिसर अस्वच्छ, दुषीत तर होतोच पण साथीचे आजारही फैलावण्याची शक्यता आहे. राज्यात गुटखा बंदी असताना यांना गुटखा मिळतोच कसा याबाबत प्रशासनाने दखल घेवून सार्वजनिक ठिकाणी थुकणाऱ्यांना आळा घालणे आवश्यक आहे.अशी नागरिकांची मागणी आहे.

0Shares
error: Content is protected !!