जावळी प्रतिनिधि/कदिर मणेर
जावळी:विजेच्या सारख्या लंपडावाने कुडाळ,करहर,सायगाव भागातील नागरिक हैराण झाले आहेत.गेल्या काही दिवसा पासून कुडाळ, करहर,सायगाव येथे दररोज तासन-तास वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे, नागरिक हैराण झाले आहेत. खंडित वीज पुरवठ्या संदर्भात तक्रार केल्यावर सबंंधित कर्मचारी उड्डवाउड्डवीचे उत्तरे देत असल्यामुळे नागरिकांतर्फे महावितरणच्या कामावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.महावितरणतर्फे सध्या शहरासह जिल्ह्यात कुठेही भारनियमन होत नसल्याचा दावा करण्यात येत असला तरी, ग्रामीण भागामध्ये मात्र वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांतर्फे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.कुडाळ तसेच परिसरात मध्ये दररोज रात्री-अपरात्री विज पुरवठा खंडित होत आहे. काही दिवसांपासून तर दररोज २ ते ४ तास विज पुरवठा खंडित होत असून,या संदर्भात तक्रार केल्यावर काम सुरु असल्याचे सांगितले जाते. मात्र, कुठे काम सुरु आहे, कोणते काम सुरु आहे. विशेष म्हणजे बहुतांश वेळा सायंकाळीच वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे, कामावरुन घरी आलेल्या मजूरवर्गाला यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा आहेत. तसेच गावात वायरमन फोन उचलत नसल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यावर नागरिकांचे अधिकच हाल होत आहेत.सध्या पावसाळा सुरु असल्याने, वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. यामुळे गावात पूर्णवेळ वायरमन नियुक्त करण्याची मागणी आहे.अनेक ठिकाणी विद्युत खांब अन् तारा लोंबकळलेल्या अवस्थेत दिसुन येतात.काही अनेक ठिकाणी विद्युत तारा व खांबही वाकलेले आहेत.विद्युत खांब वर्षानुवर्ष जुने असल्यामुळे,या खाबांची अत्यंत दुर्दशा झाली आहे.तरी महावितरण प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ