IHRA News

IHRA Live News

पाचगणी मध्ये मतदार यादीत नाव लावन झालं सोप ?

पाचगणी प्रतिनिधि/नौशाद सय्यद
पांचगणी महाबळेश्र्वरच्या मतदार यादीत सर्वांना वाटते माझे नाव असावे.पांचगणी महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ व शैक्षणिक ठिकाण आहे.पांचगणी महाबळेश्र्वर इथले व्यवसाय हॉटेल,बंगलो हे बाहेरून येणाऱ्या लोकांचे आहेत.हॉटेल, शाळा,बंगले,येथील केअरटेकर व कामगार यूपी,बिहार,राजस्थान,काश्मीर,नेपाल,कर्नाटक ,केरळ,मराठवाडा,महाड,रत्नागिरी,गुजरात,सुरत,.येथील सर्व लोक काम करत आहेत.
पांचगणी महाबळेश्वर नगरपालिकेचे इलेक्शन असले की हे पाचगणी चे इलेक्शन आहे का पूर्ण भारताचे इलेक्शन आहे हा लोकांना प्रश्न पडतो आहे.खरतर हे नावे घालून कोणाचे फायदे होत आहे का,मतदारांचे ? का उमेदवारांचे.पांचगणी नगरपालिका मध्ये या लोकांचे यादीत नाव घालने इतके सोपे झाले आहे कि एखादा वक्ती पांचगणी मध्ये आल्या नंतर त्याचे एक दोन महिन्यांमध्ये त्याचे नाव मतदार यादीत दाखल होत आहे.त्या मध्ये महत्त्वाचे स्थानिक व इचूक उमेदवार त्या लोकांना मदत करत असतात.१००-२०० मतांचा गठ्ठा बनवून निवडून येण्याची कल्पना अनेक वर्षापासून चालू आहे.अनेक नगरसेवक या मध्ये यशस्वी ही झाले आहेत.खरतर नगरपालिकेची निवडणूक जनते मधून कश्यासाठी असते.स्थानिक प्रभागमधून व पांचगणी मधील अडी अडचणी व विकासाची कामे यासाठी हे हक्क डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधानामध्ये नागरिकांना दिलेला हक्क आहे.परंतु येथे. बाहेरून येणारे लोक कामगार,बंगले,शाळेतील कामगार,प्लंबर इलेक्ट्रिशन,सुतार,गवंडी, कडीया,पेट्रोल पंप वरील कामगार,चायनीज वाले.हे लोक पांचगणी चा यादीत नाव घालण्यात इच्छूक का असतात हे मतदाराला माहिती आहे व इच्छुक उमेदवारालाच देखील माहित आहे.व तुम्ही स्वतः कल्पना करू शकता.असे सगळे घडत राहिले तर स्थानिक भूमी पुत्रांना स्टॉल मिळणार नाही,पार्किंगचा प्रश्नानं मिटणार नाही स्वच्छ पाणी मिळणार नाही धोम धरणाचे पाणी पांचगणी मध्ये येणार नाही,पर्यटकाला बघायला चांगले पॉइंट रहाणार नाहीत.अस का घडतय कुणामुळे घडतय याचा वेळीच विचार करण गरजेच आहे.

0Shares
error: Content is protected !!