IHRA News

IHRA Live News

बैल चोरीच्या आरोपीस केले सेवाग्राम पोलीसांनी जेरबंद

वर्धा7 :-प्रतिनिधी /दिपाली चौहान
सूत्रा कडून प्राप्त माहितीनुसार बैल चोरीच्या आरोपीला सेवाग्राम पोलीसांनी जेरबंद केले आहे.
फिर्यादीचे नाम आशिष नारायणराव मुडे वय 32 वर्ष, रा.बरबडी यांनी दि. 06/08/2022 रोजी पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे तक्रार दिली की, त्याचे मौजा बरबडी शेत शिवारात शेतातील टिनाचे बंड्यामध्ये फिर्यादीने त्याचे 2 गाई, 2 वासरे, व दोन जरशी बैल दि. 05/08/2022 रोजी सायंकाळी बांधुन घरी आले दि. 06/08/2022 चे सकाळी 7.00 वा फिर्यादी शेतात गेले असता दोन बैलापैकी एक जरशी जातीचा बैलपांढरे रंगाचा लांब सिंगे असलेला कि 23000/- रु चा दिसुन आला नाही फिर्यादीने शोध घेवुन मिळुन न आल्याने पो.स्टेला रिपोर्ट दिली वरुन सदरचा गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.
सदर गुन्ह्याची तात्काळ दखल गुन्हे प्रकटीकरण पथकाने घेवून पो. स्टे. परिसरात गुप्त बातमीदार नेमुन गुप्त बातमीदाराकडुन मिळाले ल्या माहिती प्रमाने आरोपी गजानन उर्फ विठ्ठल बालाजी खोडके वय 39 वर्ष, रा. शिवणी त. समुद्रपुर जि वर्धा यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन गुन्ह्यतील चोरीस गेलेले एक जरशी जातीचा बैलपांढरे रंगाचा लांब सिंगे असलेला कि 23000/- रु चा जप्ती करुन गुन्हा उघडकीस आणला.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री पियुश जगताप, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री निलेश ब्राम्हणे पोलीस स्टेशन सेवाग्राम याचे निर्देशाप्रमाणे स.फौ मारोती कातकर बक्र. 594 पो. हवा. हरिदास काकड, नापोशि. गजानन कठाणे, पोशि पवन झाडे आशिष लाडे नेमणुक पोलीस स्टेशन सेवाग्राम यांनी केली.

0Shares
error: Content is protected !!