IHRA News

IHRA Live News

जावळीत भात लागवडीची कामे अंतिम टप्यात !

जावळी प्रतिनिधि/कदिर मणेर
जावळी : जावळी तालुक्यामध्ये डोंगर भागात भात लागवडीची कामे वेगात सुरु असून, अनेक ठिकाणची भात लावणीची कामे संपत आली आहेत.काही ठिकाणी अद्यापही खाचरातील पाणी कमी झाले नसल्याने त्याठिकाणी भात लावणीचे काम सावकास सुरु आहे.

अनेक ठिकाणी ट्रॅक्टर, रोटरच्या सहाय्याने चिखल करण्याचे काम सुरु आहे.काही ठिकाणी औतास बैल जुंपून भातलावणीसाठी चिखल केला जात आहे.

पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्याने डोंगर माथ्यावरवरुन येणारे भरपूर पाणी खाचरात साचले आहे.काही ठिकाणी चिखल असल्यामुळे तेथील भात लागवडीची कामे संपत आली आहेत,अशी माहिती शेतकरी वर्गाकडून मिळत अाहे. जून महिन्यात पावासाने दडी मारल्याने जावळीतील भात लागवडी रखडल्या होत्या.मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीसच पावसाने दमदार सुरुवात केल्यामुळे भात खाचरे तुडुंब भरली अन् शेतकर्‍यांनी लावणीसाठी लगबग सुरु केली होती.आता लावणीचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून, काही शेतकर्‍यांनी भात लावणीचे काम पूर्ण केले आहे.

0Shares
error: Content is protected !!