IHRA News

IHRA Live News

कुडाळ चौकातील दिशादर्शक फलक शुभेच्छा फलकामूळे जातोय झाकळून !

जावळी प्रतिनिधि/कदिर मणेर

कुडाळ : सह्याद्री पेट्रोल पंपाजवळील छ.संभाजीमहाराज चौकामध्ये मेढा,पाचगणी,महाबळेश्वर तसेच परिसरामध्ये जाण्यासाठी दिशादर्शक फलक आहे, मात्र त्यावर सतत शुभेच्छांचे फलक लावलेले असतात. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांचा रस्ते शोधताना संभ्रम होतो,संबंधित गावपुढार्यांनी याची तत्काळ दखल घेऊन दिशादर्शक फलकासमोर शुभेच्छा फलक लावण्यास मनाई करावी असी मागणी गावातील नागरिकांतून होत अाहे.

सण, उत्सव असोत की कार्यकर्ता वा नेत्याचा वाढदिवस, किंवा कोणाची मोठ्या पदावर नियुक्ती झाल्यास रातोरात गल्लीबोळापासून ते मुख्य रस्त्यापर्यंत कुडाळ शहरामध्ये बेकायदा बॅनर, होर्डिंग्ज लावले जातात. रस्त्यावरील विद्युत खांबांवर किंवा इतर मोक्याच्या ठिकाणी बॅनर लावण्यात येत असून काही वेळेला बॅनरमुळे दिशादर्शक फलक झाकले जातात. मात्र, याचे कोणालाच काही गांभीर्य नाही. बस थांब्यांवरही बॅनर लावले जात असून बॅनर लावण्यामध्ये राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते आघाडीवर असतात. अनेकदा संपूर्ण शहर होर्डिंगमय होऊन जाते. जिकडे नजर जाईल तिकडे बॅनर, होर्डिंग्ज नजरेस पडतात. अनेक भिंतीवरही भित्तिपत्रके लावून भिंतीचे विद्रुपीकरण करण्यात येते.याचा नाहक त्रास प्रवास तसेच दुकानदारांना होतो.नागरिकांची मात्र यामुळे गैरसोय होते.
.

0Shares
error: Content is protected !!