IHRA News

IHRA Live News

मेढा,कुडाळ येथील पोलिस ठाण्यामार्फत कुडाळ येथील मस्जिदमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन.

कदिर मणेर/प्रतिनिधी
कुडाळ(सातारा)जावळी तालुक्यातील मेढा,कुडाळ येथील पोलिस ठाण्यामार्फत रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथील मस्जिदमध्ये मुस्लिम बांधव यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.

मागील दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे सर्व सार्वजनिक सण-उत्सव आणि कार्यक्रमावर प्रतिबंध होता.परंतु,यावर्षी कोरोना नियंत्रणात आल्यानंतर सर्व नियम शिथिल झाल्यामुळे, मेढा कुडाळ पोलीस ठाण्याच्या वतीने शुक्रवारी मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल जानवे खराडे, अमोल माने, हवालदार इम्रान मेरकरी,कॉन्स्टेबल घोरपडे,मुस्लिम बांधव विविध समाजाचे प्रतिष्ठित नागरिक, राजकीय पदाधिकारी, पत्रकार,व्यापारी बांधव उपस्थित होते.

यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. शीतल जानवे यांनी मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी डीवायएसपी डॉ. शितल जानवे म्हणाले की,प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सोशल मीडियाचा वापर करताना जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे.तसेच सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आवाहन केले.यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने मेढा,कुडाळ पोलिसांचे अाभार मानण्यात अाले. यावेळी कुडाळ गावातील सह्याद्री पेटो्ल पंपाचे मालक,अभ्यासू,समाज मार्गदर्शक हाजी अब्दुल अजिज मुजावर यावेळी म्हणाले,सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनीप्रयत्न करावे

0Shares
error: Content is protected !!