IHRA News

IHRA Live News

घरात घुसून मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या आरोपीतास सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दंड

वर्धा 12:- प्रतिनिधी / दिपाली चौहान

मा. जिल्हा न्यायाधीश-1 तथा अति. सत्र न्यायाधीश, वर्धा (श्रीमती मो.ई. आरलैंड) यांनी 10 वर्षे जुण्या प्रकरणात आरोपी नामे 1) प्रशांत वसंतराव ढांगे, 2) राजु उर्फ राजेंन्द्र वसंतराव ढांगे, 3) प्रभाकर नागोराव पेंदाम, 4) पवन सुरेशसिंह डोबवाल, 5)रितेश सुरेशसिंह डोबवाल, 6) विट्ठल गोविंदराव चैके, 7) सुनिल सुरेश वानखेडे 8) प्रकाश नथ्थु तेलंगे, 9) निलेषसिंग किषोरसिंग घुमाळे, 10) रोशन मारोती ढोंगे, 11) रमेश लक्ष्मणराव डडमल, सर्व राहणार विजयगोपाल, ता. देवळी, जि. वर्धा यास कलम 452 भा.द.वी. कायद्यानुसार सर्व आरोपीतांस सात वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी रू. 10,000/- दंड तसेच दंड न भरल्यास अतिरीक्त 3 महिण्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा, कलम 143 भा.द.वी. कायद्यानुसार सर्व आरोपीतांस सहा महिण्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी रू. 1,000/- दंड तसेच दंड न भरल्यास अतिरीक्त 15 दिवसाच्या सश्रम कारावासाची शिक्षा, कलम 147 भा.द.वी. कायद्यानुसार सर्व आरोपीतांस 2 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी रू. 5,000/- दंड तसेच दंड न भरल्यास अतिरीक्त 1 महिण्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा, कलम 504 भा.द.वी. कायद्यानुसार सर्व आरोपीतांस 2 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी रू. 5,000/- दंड तसेच दंड न भरल्यास अतिरीक्त 1 महिण्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा, तसेच प्रकरणातील आरोपी क्र. 1,2,4,5,9,10 यांना वरील शिक्षे व्यतिरिक्त कलम 3(1)(गप) अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबधंक कायद्यानुसार 5 वर्शांच्या सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी रू. 7,000/- दंड तसेच दंड न भरल्यास 2 महिण्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठाविण्यात आली. तसेच फिर्यादी/पिडीत याला दंड रक्कमेतून रू. 2,00,000/- देण्याचे व उर्वरीत रक्कम शासन जमा करणेबाबत आदेशित करण्यात आले.

घटनेची थोडक्यात हकीगत अषी की, यातील फिर्यादी याचा मुलगा प्रकाश तुकाराम तेलंगे याने गावातील दादाराव पेंदाम याची सोयाबीनची गंजी जाळल्यावरून रिपोर्ट देण्यात आली होती. सदर रिपोर्टच्या अनुषंगाने घटनेच्या दिवशी पोलीस प्रकाशला अटक करण्याच्या पुर्वी आरोपीतांनी गैरकायदेशिर जमाव करून तुकरामच्या घरात घुसून आरोपी व इतर लोक यांनी ‘‘आमची सोयाबीनची गंजी जाळतो’असे म्हणून फिर्यादी त्याचा मुलगा प्रकाश तसेच फिर्यादीची पत्नी व सुन यांना जातीयवाचक शिवी देवून तसेच त्यांचे कपडे फाडले व त्यांना मारहाण केली व त्याच वेळेस पोलीस तेथे आले असता प्रकाश यास अटक करून घेवून गेले. प्रकाशला अटक करून घेवून गेल्यानंतर प्रकाशचे वडील तुकाराम यांनी आरोपीनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहान केल्याबाबतची फिर्याद दाखल केली.

सदरची घटनेचा रिपोर्ट तुकाराम तेलंगे यांनी पोलीस स्टेशन पुलगाव येथे तोंडी रिपोर्ट दिला व पो.स्टे. पुलगाव यांनी कलम 452, 143, 147, 504 भा.दं.वि. व कलम 3(1)(ग) अनु.जाती.जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार प्रमाणे सदरचा गुन्हा नोंद केला. सदर प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग पुलगाव येथील जितेंद्र पोपटराव जाधव यांनी केला व आरोपीतांनी गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे अपराध क्रमांक-235/2012 नुसार दोषारोप पत्र मा. न्यायालयात दाखल केले.

सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील, श्री. गिरीश व्ही. तकवाले यांनी कामकाज पाहिले व यशस्वी युक्तीवाद केला. त्यांना पैरवी अधिकारी सहा. पोलीस उपनिरिक्षक, अनंत रिंगणे ब.क्र. 175, पो.स्टे. पुलगांव यांनी साक्षदारांना मा. न्यायालयात हजर करून मोलाची कामगीरी बजावली. शासनातर्फे एकूण 9 (नउ) साक्षीदार तपासले. साक्षदारांची साक्ष तसेच जिल्हा सरकारी वकील, श्री. गिरीश व्ही. तकवाले यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीस मा. जिल्हा न्यायाधीश-1 तथा अति. सत्र न्यायाधीश, वर्धा (श्रीमती मो.ई. आरलैंड) यांनी आरोपींतास दिनांक 12/04/2022 रोजी वरील प्रमाणे शिक्षा ठोठाविण्यात आली.

सदर प्रकरणी मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव श्री गोळुळसिंग पाटील यांनी मार्गदर्शन केले.

0Shares
error: Content is protected !!