ग्रामीण भागातील जत्रा-यात्रांचा हंगाम भरल्यामुळे फिरत्या व्यावसायिकांना अच्छे दिन!
कदिर मणेर. कुडाळ तसेच जावळी तालुक्यातील कोरोना काळातील निर्बंधामुळे कुठलाही समाज एकत्र येवून कोणतेही सामाजिक काम करत नव्हता परंतू सध्या कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाचे निर्बंध उठले आहेत.त्यामुळे ग्रामीण भागातील यात्रांचा हंगाम बहरला आहे. ग्राम दैवतांच्या यात्रेच्या निमित्ताने नोकरी निमित्त,कामा निमित्त बाहेर गावी असणारे तसेच पै-पाहुण्यांचा गावाकडे येण्याचा अोघ वाढला आहे.यात्रांमध्ये गौंडे,गुलाल-खोबरे,मिठाई,आईस्क्रीमसह खेळण्यांपासून गृहोपयोगी वस्तूंची दुकाने विविध खेळ,पाळणे आदींमधून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने फिरत्या व्यावसायिकांना अच्छे दिन येऊ लागले आहेत.मागील दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे गर्दी होणाऱ्या सण-समारंभावर शासनाने निर्बंध लावले होते.जनतेवर निर्बंध होतेच त्याचबरोबर ‘देवां’सह देऊळेही बंद झाली होती.या कारणामुळे गावोगावच्या यात्रा-जत्रा निर्बंधांच्या जोखडात अडकलेल्या होत्या. सर्वजण कोरोनाच्या संसर्गाच्या धास्तीखाली वावरत होते.त्यामुळे सण-समारंभासह ग्रामदैवतांच्या वर्षातून एकदा साजर्या होणार्या यात्रा देखील साध्या पद्धतीने साजऱ्या होत होत्या.यात्रेला नेहमी येणारे पै-पाहुणे देखील यात्रेला फिरकत नव्हते.मात्र,यावर्षी कोरोना निर्बंध हटले असल्यामुळे ग्रामीण भागात यात्रांचा हंगाम बहरू लागला आहे. यात्रेसाठी येणाऱ्या चाकरमान्यांचा तसेच पै-पाहुण्यांचा राबता वाढला आहे.तब्बल दोन वर्षांनी मोठ्या प्रमाणावर यात्रा भरवण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे.यात्रेच्या निमित्ताने सर्व पै-पाहुणे एकत्र येवून,एकत्र जमून सर्वांच्या गाठीभेटी होत असतात.त्या भेटीमध्ये विचारांची देवाणघेवाण होते.लग्न कार्ये जुळून येतात.कोरोना काळात यात्रा भरवण्यात न आल्याने त्यावर अवलंबून असलेल्या फिरत्या व्यावसायिकांचा आर्थिक कणाच मोडला होता परंतु कोरोनाचे निर्बंध हटून यावर्षी जोरदारपणे यात्रा भरू लागल्याने या व्यवसायिकांना अच्छे दिन आले आहेत.(जंगी कुस्त्यांचे फड,तमाशा)ग्रामीण भागातील यात्रा या लोककलावंतांच्या तमाशा आणि कुस्त्यांच्या फडा शिवाय पूर्ण होत नाही. ग्रामीण भागात तमाशा आणि कुस्ती शौकिनांची संख्याही मोठी आहे त्यातच शासनाचे निर्बंध उठल्याने यावर्षी यात्रा मोठ्या प्रमाणावर साजऱ्या होत असल्याने बैलगाडी शर्यती सह तमाशा आणि जंगी कुस्त्यांचे फड रंगू लागले.कोरोना काळात विस्कटलेले तमासगिरांचे फड आता पुन्हा नव्या उमेदीने अाणि ताकतीने उभे राहिले आहेत.
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ