IHRA News

IHRA Live News

कुडाळ येथील श्री. पिंपळेश्रर ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या चेअरमनपद व व्हा.चेअरमनपद निवड बिनविरोध. कदिर मणेर/जावळी प्रतिनिधी दि.८/३/२०२२रोजी श्री. पिंपळेश्रर पतसंस्थेच्या अध्यक्षपदी श्री. चंद्रशेन शिंदे व उपाध्यक्षपदी श्री. ज्ञानेश्वर भाऊ कुंभार यांची बिनविरोध निवड झाली.१९९६रोजी स्थापन झालेल्या या संस्थेने आपल्या सभासदांना पतपुरवठा करुन त्यांच्या अनेक गरजा पुर्ण करुन मदत केली आहे.सभासदाना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत स्थापनेपासून या पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध होत आली आहे.कोरोना सारख्या माहामारीच्या काळात संस्थेने आपली सामाजिक बांधिलकी जपत लोकांना सहकार्य संस्थेने केले आहे यामुळे लोकांचा फार मोठा विश्वास या संस्थेने संपादन केला असून आज निवडणूक निर्णय अधिकारी श्री. विशाल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली खाली संस्थेमध्ये या निवडी पार पडलेल्या आहेत. संचालक म्हणून निवडून आलेले व्यक्ती खालील प्रमाणे सर्वसाधारण गटातून कदम विजय विलास,शिंदे शामराव गुलाबराव,किर्वे अरुण रामचंद्र,कुंभार ज्ञानेश्वर भाऊ,शिंदे चंद्रशेन सुरेशराव,शिंदे सचिन विजयसिंह,शिंदे विरेंद्र सुरेशराव,अनुसूचित जाती/जमाती सभासद राखीव-देवकर उत्तम शंकर,महिला राखीव-शिराळकर विमल रमेश,मणेर सलामत सिकंदर,इतर मागास प्रवर्ग राखीव-रासकर सुनिल गणपत,भटक्या विमुत्त जाती/जमाती विशेष मागास प्रवर्ग कांबळे विलास गणपत. सचिव म्हणून श्री.अजित रमेश शिराळकर व कायदेशीर सल्लागार म्हणून श्री.सतिष प्रकाशराव शिंदे काम पाहत अाहेत.

0Shares
error: Content is protected !!