IHRA News

IHRA Live News

जावली तालुक्यात गौण खनिज उत्खननाचा सुळसुळाट तलाठी मंडल आधिकारी गांधारीच्या भुमिकेत.

महाबळेश्वर प्रतिनिधी .
बाजीराव उंबरकर.
जावली तालुक्यात भिलार उंबरी मार्गे जोड रस्त्यालगत अनाधिकृत उत्खनाला जोर आला असून धनदांडग्यांनी विना परवाना उत्खनन करून आपला आलिशान बंगला उभा करायची स्वप्न पाहत आहेत. काही जनांचे स्वप्न पूर्ण झाली आहेत तलाठी मंडल आधिकारी गांधारीच्या भुमिकेत का हा प्रश्न निर्माण झाला आहे.ज्या धनदांडग्यांनी जमिनी विकत घेऊन बंगले उभे करायचे तलाठी मंडल आधिकारी हाताशी धरून आपले काम पूर्ण करू पहात आहेत. पण याचा भुर्दंड सर्व सामान्य नागरिक यांना सोसावा लागत आहे या धनदांडग्यांनी डोंगरमाथ्यावर जमिनी खरेदी करून रहात असून डोंगराळ भागात विना परवाना बांधकाम विना परवाना उत्खनन केल्याने मोठी जिवितहानी होत आहे याच डोंगर पायथ्याशी शेतकरीवर्ग वास्तव्यास आहे.पावसाळ्यात पाणी जमिनीत मुरते आणी मोठ्यप्रमाणावर भुस्खलन होऊन डोंगरच्या डोंगर भुईसपाट झालेले आपण अनुभवले आहे. जमिनीचे भुस्खलन होण्यासाठी तलाठी मंडल आधिकारी हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. या गांधारीच्या भुमिकेतील बेजबाबदार तलाठी मंडल आधिकारी यांच्यावर शासनाने कायदेशीर कारवाई करावी आणी पर्यावरणाला नाहक हाणी पोहोचवणाऱ्या संबंधितावर शासनाने कायदेशीर कारवाई करावी आणी निसर्गाची होणारी हानी थांबवावी .

0Shares
error: Content is protected !!