कदिर मणेर/जावळी प्रतिनिधी.
कुडाळ (ता,जावळी)मध्ये गेल्या चार दिवसांपासून आमदार शशिकांत शिंदे साहेब चषक क्रिकेट सामन्याची सुरुवात झाली.आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस होता आणि या स्पर्धेत फायनल सामना हूमगाव विरुद्ध केळघर या दोन संघांचा झाला या अटीतटीच्या सामन्यात हुमगाव संघाने केळघर संघावर मात केली व आमदार चषकावर आपले नाव कोरले.विजेत्या संघाला माथाडी कामगार नेते ऋशिकांत शिंदे यांच्या हस्ते अा.चषक देण्यात अाला.
या भरवलेल्या क्रिकेट स्पर्धेमुळे जावळी तालुक्यातील पुर्ण वातावरण राष्ट्रवादीमय झाले होते.आमदार चषक २०२२ या स्पर्धेसाठी शशिकांत शिंदे आणि त्यांचे भाऊ ऋशिकांत शिंदे तसेच साहेब व ऋशिभाई यांचे कट्टर समर्थक. अत्यंत विस्वासू समीर डांगे यांनी विशेष प्रयत्न केले तसेच नेटके नियोजन केले.
अा.चषक २०२२ च्या अनुषंगाने जणू आ.शशिकांत शिंदे यांनी जावळी तालुक्यात राष्ट्रवादी चा पाया मजबूत करण्यासाठी रणशिंग फुंकले असल्याची चर्चा पूर्ण जावळी तालुक्यात होत आहे.
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ