IHRA News

IHRA Live News

दहा वर्षापासुन फरार असलेला आरोपी सेवाग्राम पोलीसाच्या जाळ्यात


दिपाली चौहन /प्रतिनिधी(जिल्हा वर्धा)११/०२/२०२२ 
 सूत्रांकडून प्राप्त माहितीच्या आधारे आज पोलीस स्टेशन सेवाग्राम येथ अप.क्र. १०४/२०११ कलम ४२०,३९५ भादवी चा गुन्हा नोंद होता परन्तुज सदर गुन्हयात एकुन १२ आरोपी असुन त्यापैकी काही आरोपीना अटक करुन प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले  होते परंतु गुन्ह्यातील आरोपी नामे जनार्धन बापूराव जाधव वय ४२ वर्ष, रा उमरी (कोरा) जि वर्धा हा गुन्हा नोंद झाल्यापासुन आज पावेतो आपल्या मुळ गावी न राहता ईतरञ राहुन काम काज करित होता.तो वर्धेतून दहा वर्षांपासून फरार झाला त्याला असे वाटले  होते कीइतके वर्ष झाले आता त्याला कोणीच पकडू शकणार नाही पण गुप्त बातमीदारा कडुन प्राप्त माहीती नुसार सदर आरोपी हा बारमती येथे राहत असल्याची माहीती सेवाग्राम गुन्हे प्रकटीकरण पथकास प्राप्त झाल्याने तात्काळ बारामती येथे रवाना होवुन आरोपीस ताब्यात घेवुन आरोपीस मा. न्यायालयाचे स्वाधीन करण्यात आले.व पुढील कार्यवाही सुरू झाली.
   सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री पियुश जगताप, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री निलेश ब्राम्हणे पोलीस स्टेशन सेवाग्राम याचे निर्देशाप्रमाणे पो. हवा. हरिदास काकड, नापोशि. गजानन कठाणे, जयेश डांगे,  पोशि पवन झाडे अभय ईगळे सर्व नेमणुक पोलीस स्टेशन सेवाग्राम तसेच सायबर सेल चे निलेश कट्टोजवार यांनी केली.
0Shares
error: Content is protected !!