IHRA News

IHRA Live News

कुडाळ मेढा रस्त्यावरील कुडाळी नदीवरील पुलाची दयनीय अवस्था

कदिर मणेर/प्रतिनिधी सातारा
कुडाळ तालुका जावळी येथील पाचवड कुडाळ मेढा या मार्गावर असणार्या कुडाळी नदीवरील पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली अाहे. या पुलाच्या प्लेअरवरील प्लास्टर(सिमेंट)पुर्ण पणे निकामी खराब झाले असून ते पडण्यास सुरुवात झाली अाहे. त्या प्लेअरवरील लोखंडी गज हे उघडे पडलेले दिसून येत अाहेत.प्लेअर वर तसेच पुलाच्या स्लॅब खाली झाडी,झुडपे अालेली स्पष्ट दिसतात.पुलावर दोन्ही बाजूने सुरेक्षेसाठी लावलेल्या लोखंडी पाईप त्या सुध्दा तुटून पडलेल्या अाहेत.त्या पडलेल्या जागेतून खाली नदीमध्ये पडून एक,दोन जणांचा मुत्यू देखील झालेला अाहे तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला तसेच प्रशासनाला जाग येत नाही.प्रशासन गांधारीच्या भुमिकेत असल्यामूळे नागरिकामधून असे म्हणले जात अाहे की प्रशासन मोठ्या दुर्घटनेची तर वाट
पाहत नाही ना ? कारण मोठी घटना घडल्यानंतर शासनाला जाग येते त्या अगोदर निष्पाप जिवांना जीव गमवावा लागतो.

0Shares
error: Content is protected !!