IHRA News

IHRA Live News

आमदार शशिकांत शिंदे यांच्या मध्यस्थीने जावळीतील ऊस तोडणी प्रश्र मार्गी

कदिर मणेर/सातारा प्रतिनिधी

जावळी तील ऊस तोडणी प्रश्न आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या मंध्यस्थीने मार्गी.कोरेगाव येथे आमदार शिंदे यांच्या निवासस्थानी ऊस उत्पादक शेतकरी तसेच जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना यांचे अधिकारी श्री सिनगारे साहेब, श्री जगदाळे साहेब, श्री बुवासाहेब पिसाळ यांचे उपस्थिती मध्ये मिटींग होऊन सर्व शेतकऱ्यांचा ऊस तुटल्या शिवाय कारखाना बंद करणार नाही असे आश्वासन श्री शिनगारे साहेब यांनी श्री शिंदे साहेब व सर्व शेतकरी यांचे समवेत झालेल्या मीटिंगमध्ये दिले. दोन ते तीन दिवसांमध्ये कारखान्याची ऊसतोड यंत्रणा जावळीत दाखल होऊन शेतकऱ्यांचा ऊस तोडणी काम वेगाने सुरू होईल असा शब्द श्री जगदाळे साहेब यांनी दिल्याने सर्व शेतकरी वर्ग आनंदी झाला.

या मिटींगला उपस्थित श्री अशोकराव परामणे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती,श्री प्रमोद पवार युवा नेते, श्री शरद परामणे, श्री बंडा परामणे,सचिन परामणे,समीर डांगे,सचिन तरडे, नितीन परामणे,इ.शेतकरी तसेच सोमर्डी, भिवडी,बामणोली,आखाडे, इंदवली,नेवेकरवाडी, सायगाव,शेते,या गावातील ऊस उत्पादक शेतकरी हजर होते.

0Shares
error: Content is protected !!