IHRA News

IHRA Live News

टेबललॅंन्ड व्यापारी असोसिएशन,सर्व घोडे व घोडागाडी व्यावसायिक यांच्याकडून हेन्री जोसेफ यांच्या वक्तव्याचा निषेध.

पाचगणी प्रतिनिधी/नौशाद सय्यद. *जाहिर प्रसिध्दी पत्रक*
आम्ही या प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहिर करतो की हेन्री जोसेफ यांनी मांडलेली भूमिका कोणालाही न रुजणारी आहे.गेली तीस वर्षांपासून आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड टेबललॅंन्ड वरील व्यावसायिकांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहिले आहेत.येथील सर्वसामान्य व्यावसायिकांवर ज्या ज्या वेळी गटातंर आले त्या त्या वेळी ते धावून आले असून,त्यांनी गोरगरिबांच्या चुली व रोजीरोटी चालू ठेवण्याचे काम केले आहे.परंतू हेन्री जोसेफ यांनी आमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत यात कोणी राजकारण करु नये हे स्टेटमेंट केले आहे ते चुकीचे आहे.मुळात अशोक गायकवाड यांच्या प्रयत्नातून टेबललॅंन्ड सुरू होणार होते.परंतू हेन्री जोसेफ यांनी अशोक बापूचे प्रयत्न हाणून पाडले असून ही गोष्ट निषेधार्य आहे.त्यामुळे टेबललॅंन्ड व्यापारी असोसिएशन कडून या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे.वास्तविक टेबललॅंन्ड सुरू होऊ नये हीच भूमिका हेन्री जोसेफ यांची आहे.आपल्या स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या अशोक गायकवाड यांच्यावर टीका करणं यातनादायी आहे.त्यामुळे आम्ही टेबललॅंन्ड व्यापारी असोसिएशन, सर्व घोडे व घोडागाडी व्यावसायिक या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतो.हेन्री जोसेफ यांच्या भुमिकेशी टेबललॅंन्ड वरील एकही व्यावसायिक सहमत नाही.
*दिलिप कांबळे, सेक्रेटरी टेबललॅंन्ड व्यापारी असोसिएशन पाचगणी*

0Shares
error: Content is protected !!