IHRA News

IHRA Live News

श्रीछाया बालगृहाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन साजरा

प्रतिनिधी/ दिपाली चौहन (जिल्हा वर्धा)

आज दि.२६ जानेवारी२०२२ रोजी संपूर्ण देशात ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला .या प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्ताने वर्धा शहरातील श्री छाया बालगृह,नालवाडी,वर्धा येथे बालगृहाच्या अध्यक्ष मा.सौ.डॉ.उषाताई फाले यांच्या शुभ हस्ते झेंड्याला सलामी देण्यात आली बालगृहाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला.
यावेळी संस्थेचे संचालक, मा.श्री फाले साहेब,तसेच उपाध्यक्ष मा.श्री वैभव फाले साहेब, बालगृह अधीक्षक,मा. स्वप्नील मानकर,मूक बधीर शाळेच्या मुख्याध्यापिका मा.लोखंडे मॅडम, , अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक, मा.नरवरे सर, मंगेश सर, दिपाली परमाल, आदेश राठोड, शैला दाते, सागर घाटे , सुनंदा पाहुणे, भोयर मॅडम, शरद शामतकर सर, बारेकर मडम, इत्यादी कर्मचारी वृंद हजर होते.
सदर विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचा मनसोक्त आनंद लुटला. संस्थेच्या अध्यक्ष मा. उषाताई फाले यांनी बालकांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व पटवून दिले. व त्यानंतर सर्व बालकांना मिष्ठान वाटप करण्यात आले

0Shares
error: Content is protected !!