वर्धा १०:-प्रतिनिधी/ दिपाली चौहन
म्युचल फंड वितरण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था एन जे इंडिया इन्व्हेस्ट प्रायव्हेट लिमिटेड चे एन जे एक्सप्रेस वर्धा हे कार्यालय मालगुजारी पुरा वर्धा येथे सुरू झाले असे वर्धा कार्यालयाचे अधिकारी श्री वैभव फाले यांनी कळविले. कार्यालयाचे उद्घाटन दिनांक 08 जानेवारी 2022 रोजी व्ही. जे. एम. वर्धा चे अध्यक्ष डॉक्टर सचिन पावडे यांच्या हस्ते व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री अभ्युदय मेघे आणि श्री अजय भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. म्युच्युअल फंड, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (पी एम एस), डिमॅट, स्टॉक मार्केट, लोण अंगेंस्ट सेक्युरिटी यासंबंधीच्या अनेक सुविधा प्रस्तुत कार्यालया मार्फत आपल्या ग्राहकांना दिल्या जातील. याशिवाय म्युच्युअल फंड आणि इतर वित्तीय सेवा वीतरण क्षेत्रात कार्य सुरू करण्यास इच्छुक नवउद्योजकांना मार्गदर्शनही केले जाईल अशी माहिती श्री वैभव फाले यांनी उपस्थित मान्यवरांना दिली. एन.जे. एक्सप्रेस वर्धा नक्कीच आपल्या गुंतवणूकदारांना आणि नवीन उद्योजकांना चांगल्या संधी व माहिती उपलब्ध करून देतील अशी आशा व कार्यास शुभेच्छा अशा शब्दात मान्यवरांनी आपले मत प्रगट केले. कार्यक्रमानिमित्ताने वर्धेतील अनेक मान्यवरांनी कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या सदिच्छा दिल्या व माहिती घेतली.
More Stories
किड्स फाउंडेशन आयोजित मोबाईलच्या दुनियेत बालक – पालक कार्यशाळा संपन्न
जिल्हा पुरवठा कार्यालय, वर्धा येथे “राष्ट्रीय ग्राहक दिन” साजरा