IHRA News

IHRA Live News

*अनाथांची माय हरपली. सिंधुताई* *सपकाळ यांचे दुःखद* *निधन*

*ठाणे प्रतिनिधी श्री सचिन शिंदे*
*अनाथांची माय हरपली. सिंधुताई* *सपकाळ यांचे दुःखद* *निधन*
ठाणे दि 4 जानेवारी 2022: महाराष्ट्राची मदर तेरेसा अशी ओळख असणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचे आज निधन झाले असून त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले काही दिवसापूर्वी त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती त्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील गलॅक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते आज अखेर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
दरम्यान हजारो अनाथ मुला-मुलींना आश्रय देत त्यांची आई झालेल्या सिंधुताई यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते महिलांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले. सिंधू ताईंच्या जाण्याने फार मोठे सामाजिक नुकसान झाले आहे अशाच सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया होत्या सिंधुताई विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली

0Shares
error: Content is protected !!