IHRA News

IHRA Live News

कुडाळ मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

कुडाळ मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

कदिर मणेर/सातारा प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले तसेच महात्मा ज्योतिराम फुले यांच्या प्रतिमेला गाडीमध्ये सजवून पुष्पहार अाणि पुष्प अर्पण करुन पूजन करण्यात अाले .नंतर गावातील बहुसंख्य महिला व नागरिक यांनी गाडीच्या पुढे ढोल वाजवत तसेच सावित्रीबाई फुले,महात्मा फुले यांच्या नावाने घोषना देवून त्यांच्या कार्याला उजाळा देत होते.

कोरोनाचे सावट असताना देखील कोरोनाचे सर्व नियम पाळून सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.लहान मुलांनी देखील पारंपारिक वेषभूषा परिधान करुन अापल्या महाराष्टा्च्या संस्कृतीचे दर्शन घडवले.या जयंती कार्यक्रमामध्ये गावातील सर्व नागरिक तसेच महिला सामील होत्या.सर्वांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.

0Shares
error: Content is protected !!